तरुण भारत

नवा प्रकार नवा धोका

कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेने अवघे जग अक्षरशः मेटाकुटीला आले आहे. या महाविनाशकारी विषाणूच्या नव्या स्ट्रेनबाबत रोज नवनवीन माहिती पुढे येत आहे.

ङनव्या प्रकाराचा धोका वयस्कर लोकांना, लहान मुलांना आणि तरुणांना अधिक असल्याचे सांगितले जात आहे. तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी असणार्यांनी, मूत्रपिंडाचे किंवा हृदयाचे आजार असणार्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर महिलांनाही या विषाणूचा धोका अधिक असल्याचे समोर आले आहे.

ङबर्मिंगहॅम विद्यापीठात करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. या अभ्यासानुसार, ज्या महिलांना पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचा त्रास आहे त्यांच्यासाठी कोरोनाचा हा नवा प्रकार अधिक धोकादायक आहे.

ङबर्मिंगहॅम विद्यापीठात पीसीओएसचा त्रास असेलेल्या 21,292  महिलांवर संशोधन करण्यात आले. हे करत असताना 78,310 अशा महिलांना घेण्यात आले ज्यांना ही समस्या नाही.

ङसुमारे सहा महिने हे संशोधन चालले.

ङया अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की ज्या महिलांना पीसीओएसची समस्या आहे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका 51%नी जास्त आहे.

ङयाची मिमांसा करताना अभ्यासक असे म्हणतात की, पीसीओएस या समस्येमुळे टाईप 2 मधुमेह, यकृताशी संबंधित आजार आणि उच्च रक्तदाबाच्या समस्याही उद्भवू शकतात. या समस्यांमुळे आपल्या पाचनशक्तीवरही वाईट परिणाम होतो.

ङपॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही एक संप्रेरकांशी संबंधित समस्या आहे. प्रजननक्षम वयातील अनेक महिलांना याचा त्रास होतो. या आजारात महिलांच्या ओव्हरीत एक गाठ किंवा सिस्ट तयार होते. यामुळे मासिक पाळीदरम्यान आणि गर्भावस्थेतही समस्या उत्पन्न होऊ शकतात.

ङयाच्या लक्षणांमध्ये वजन वाढणे, केस गळणे, मासिक पाळी वेळेवर न येणे किंवा पिंपल्स येणे यांचाही समावेश होतो. गेल्या काही काळात पीसीओएसची समस्या महिलांमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसत आहे.

Related Stories

समस्या स्ट्रेचमार्कस्ची

Omkar B

समस्या एसीएलची

Omkar B

वजननियंत्रणासाठी आसने

tarunbharat

सिंड्रोम एक्स म्हनजे काय ?

Omkar B

नाकातील हाड वाढल्यास

Amit Kulkarni

कोरोनिल : बाबा रामदेव यांच्यासह चौघांविरोधात FIR

datta jadhav
error: Content is protected !!