तरुण भारत

नाकातील हाड वाढल्यास

कातील हाड वाढण्याच्या स्थितीला टर्बिनेट हायपरट्रॉफी असे म्हणतात. टर्बिनेट म्हणजे नाकाच्या आत जाणार्या हवेला गरम आणि सौम्य बनवणारी रचना.

  • या टर्बिनेटचा आकार वाढला तर नाकात जाणार्या श्वासात अडथळे येतात.
  • काही जणांच्या नाकात तर तीन टर्बिनेट असतात, तर काहींच्या नाकांत चार टर्बिनेट असतात. बहुतांश लोकांच्या नाकातील वरच्या, मधल्या आणि खालच्या भागात टर्बिनेट असतात.

नाकातील हाडवाढीचे प्रकार

Advertisements
  • नाकात हाड वाढण्याचे नेजल सायकल आणि क्रॉनिक असे दोन प्रकार आहेत. जर नेजल सायकलचा विचार केल्यास या प्रकारच्या नाकात एकीकडे असलेले टर्बिनेट चार-पाच तासासाठी सूजते आणि ती सूज उतरताच दुसरीकडे टर्बिनेट सूजतात. दीर्घकाळापर्यंत सूज राहिलस टर्बिनेटचा आकार वाढू लागतो.

हाड वाढण्याचे लक्षण

  • जोरजोरात घोरणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे, नाक वाहत राहणे, चेहरा दुखणे.
  • तोंडाने श्वास घेणे, झोपेतून उठल्यानंतर घसा कोरडा पडणे, कपाळावर आठय़ा पडणे
  • नाक बंद राहणे
  • हाड वाढल्याने सर्दी होत असेल तर ती आपोआप कमी होणार नाही, हे लक्षात घ्यावे. नाकातील हाड वाढण्याच्या लक्षणांत नाकातील हाड वाकडे होणे याचाही समावेश आहे. दोन नाकपुडय़ात कार्टिलेज देखील असते आणि या कार्टिलेजला नाकाचे हाड देखील म्हटले जाते. हे हाड जेव्हा सरळ होत नाही, तेव्हा हवेत अडथळे आणतात आणि व्यक्तीला श्वास घ्यायला अडचणी येतात.
  • कारणे कोणती?
  • अमलीपदार्थाचे सेवन, हार्मोन्समधील बदल, वाढते वय, गर्भधारणा, हवेतील बदलामुळे होणारी ऍलर्जी, सर्दी- पडसं होणे, जन्मजात समस्या, दीर्घकाळापासून सायनसमुळे होणारी सूज.
  •  नाकातील हाड वाढल्यास डॉक्टर सुरवातीला मौखिक तपासणी करतात. त्यानंतर उपकरणाच्या मदतीने नाकातील भाग पाहतात आणि हाडाचा आकार तपासतात.  त्यानंतर यावर उपचार म्हणून औषधांच्या मदतीने ऍलर्जी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच सूज कमी केली जाते. यासाठी काही नेजल स्प्रेदेखील दिले जातात. तसेच ऍलर्जी वाढवणारा आहार वर्ज्य करण्याचा सल्ला दिला जातो. जोडीला प्राणायाम, अनुलोम विलोम यांसारखे व्यायाम करण्यास सांगितले जाते. औषधोपचारांनी जेव्हा फरक येत नाही आणि समस्या अधिक वाढते, तेव्हा शस्त्रक्रियेशिवाय पर्याय राहत नाही.

– डॉ. संतोष काळे

Related Stories

रक्तगटानुसार आहारनियोजन

Omkar B

‘COVAXIN’ च्या मानवी चाचणीला सुरुवात

datta jadhav

डबल म्युटंट कोरोनावर स्टेरॉईड रामबाण

Amit Kulkarni

वाफ घेतल्यामुळे… ब्युटी टॉक

tarunbharat

पतंजली आज लाँच करणार कोरोनावरील औषध

datta jadhav

नखे खाताय

Amit Kulkarni
error: Content is protected !!