22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

कोल्हापूर : गुढीपाडव्यासाठी चिवा काठी तोडण्यात शेतकरी व्यस्त, कडक निर्बंधामुळे संभ्रमावस्था

प्रतिनिधी/असळज

गुढीपाडवा सण ऐन तोंडावर आला असताना जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने पुन्हा कडक निर्बंध करण्यात लावण्यात आले आहेत. तर, दुसरीकडे गुढीपाडवा सणासाठी लागणारी चिवा काठी तोडण्यास गगनबावडा तालुक्यातून शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. मात्र, लॉकडाऊन आणि कडक निर्बंधामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत सापडला आहे.

शहराजवळील उपनगरात नदीकाठी किंवा बांधावर पूर्वी मोठ्या प्रमाणात चिवा काठी होती. परंतु ऊसा लगत असलेली चिवा बेटे ऊस उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करत असल्याने शेतकऱ्यांनी ऊसाला पसंती देऊन चिवा काठी नष्ट केली. सध्या चिवा काठी उपलब्ध नसल्याने गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, राधानगरी यासह अन्य तालुक्यातील चिवा काठी गुढीपाडव्यासाठी शहर व उपनगरात दाखल होते. त्यामुळे शेतकऱ्यांची सणासुदीच्या काळात आर्थिक उलाढाल होते. पण कोरोणाच्या धास्तीने शेतकरी संभ्रमावस्थेत सापडला आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांना कोल्हापूर शहर उपनगरात चिवा काठी नेण्यास अडचण निर्माण झाली होती. पण या वर्षी गुढीपाडवा साजरा होईल व आपली आर्थिक उलाढाल होईल या आशेने शेतकरी चिवा काठी तोडण्यास व्यस्त आहे.

चिवा काठीची मागणी शहराबरोबरच सांगली, विदर्भ, मराठवाडा यासह अनेक भागात वाढत आहे. परराज्यातून आलेली काठी शेतकरी नापसंती करत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चिवा काठीला पसंती दिली आहे. गुढीपाडव्यासाठी शेतकऱ्यांची काठी काढण्यासाठी लगबग वाढली आहे. उत्पादनाच्या तुलनेने गगनबावड्यासारख्या तालुक्यामध्ये चिवा काठीसाठी बाजारपेठ उपलब्ध होणे गरजेचे आहे.

शहर व उपनगरात चिवा काठीसाठी चांगली मागणी

कोल्हापूर शहर व उपनगर या भागात गुढीपाडव्यासाठी चिवा काठी खरेदीसाठी चांगली मागणी आहे. त्यामुळे गगनबावडा तालुक्यातील अनेक शेतकरी आपली चिवा काठी गुढीपाडव्यासाठी नेतात. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळण्यास मदत होते – शिवाजी चव्हाण, शेतकरी मु. साखरी ता. गगनबावडा

Related Stories

शाहूवाडी तालुक्यात खरीप पेरण्या पुर्ण; बळीराजा मान्सूनच्या प्रतीक्षेत

triratna

कोल्हापूर : कोविड ड्यूटीवरील शिक्षकांना कार्यमुक्त करावे

triratna

कोल्हापूर : शिरोळमधील ‘त्या’ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 5 जण निगेटिव्ह

triratna

कोल्हापूर : जिल्हय़ात ५३४ बाधित,१३ बळी

Shankar_P

कोल्हापूर : शंभर टक्के उत्तीर्ण; तोंडी परीक्षा कोणाची

triratna

..अन् मुंबई, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजीत दिवसभर पोलीस बंदोबस्त

triratna
error: Content is protected !!