25 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

पंजाब : मागील 24 तासात 2,997 नवे रुग्ण; 63 मृत्यू

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील रुग्णांनी 2.60 लाखांचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासात 2,997 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 63 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 60 हजार 020 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  


मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवशी 2,959 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2,60,020 रुग्णांपैकी 2 लाख 26 हजार 887 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 7 हजार 278 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 61 लाख 89 हजार 014 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 43,482 टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या. सद्य स्थितीत 25 हजार 855 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 369 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 24 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

तेलंगणातील लॉक डाऊन सात मे पर्यंत वाढवले

prashant_c

आंध्रमध्ये विधान परिषदेचे अस्तित्व संपुष्टात येणार

Patil_p

पद्मनाभस्वामी मंदिराचे व्यवस्थापन त्रावणकोर राजघराण्याकडे

Patil_p

नरेंद्र मोदींचे शेतकऱ्यांना नववर्षाचं गिफ्ट, खात्यात जमा करणार १२ हजार कोटी

prashant_c

राज्यात 308 नव्या रुग्णांची भर

Patil_p

प्रीमियम रेल्वेत मनोरंजनाची सुविधा

Patil_p
error: Content is protected !!