22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

मध्य प्रदेशात दोन दिवसांचा कडक लॉकडाऊन!

  • शुक्रवारी सायंकाळी 6 ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन


ऑनलाईन टीम / भोपाळ :


मध्य प्रदेशात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. त्यामुळे शिवराज सरकारने आता सर्व शहरी भागांमध्ये शुक्रवारी सायंकाळी 6 ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यापूर्वी पासून प्रदेशात नाईट कर्फ्यू सुरूच आहे. त्यानंतर आता  ‘विकेन्ड लॉकडाऊन’चा निर्णय घेतला आहे. 


मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी सांगितले की, प्रदेशातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन शहरी भागात दोन दिवस सर्व व्यवहार बंद असतील. हा विकेन्ड लॉकडाऊन केवळ शहरी भागांत लागू राहील. तसेच लॉकडाऊन दरम्यान लसीकरण मोहीम मात्र सुरूच असणार आहे, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. 


पुढे ते म्हणाले, खरे तर शहरात पूर्ण लॉकडाऊन लावण्याची आमची इच्छा कधीच नव्हती मात्र, वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या पूर्वी पासूनच प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. छिंदवाडा, शाजपुरसह अन्य भागांत लॉकडाऊन लावण्यात आले आहे. छिंदवाडामध्ये पुढील 7 दिवस हे लॉकडाऊन असणार आहे. 


लॉकडाऊनच्या काळातील नियम : 

  • लॉकडाउनच्या दिवशी सर्व बाजार आणि संस्था बंद राहतील.
  • नागरिक शुक्रवारीच आवश्यक त्या सर्व सामानाची व्यवस्था करतील.
  • मास्क शिवाय बाहेर पडल्यास खुल्या तुरुंगात ठेवले जाईल.
  • नियम तोडणाऱ्या संस्थांवर कठोर करण्यात येईल.
  • शहरांत केवळ रुग्णालय आणि मेडिकल सुरू राहतील.
  • उद्योग-धंधे सुरू राहतील, लोक आयडी कार्ड वापरून ऑफिसला जाऊ शकतात.
  • जास्त दिवस लॉकडाऊन असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये हेल्पलाइन क्रमांक जारी केले जातील.
  • कंटेन्मेंट झोनची संख्यादेखील वाढण्यात आली आहे. 
  • होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची मॉनिटरिंग केली जाईल. 

Related Stories

सोने दर घसरला; चांदीची भाववाढ

Patil_p

कोरोना आटोक्यात आल्यानंतर दुसरे आर्थिक पॅकेज

Patil_p

एअर इंडियाची उड्डाणे 30 एप्रिलपर्यंत बंद

Patil_p

कोल्हापूर : ‘त्या’ डॉक्टरसह रिसेप्शनिस्टही कोरोना पॉझिटिव्ह

triratna

चीनमधील कोरोनाबाधितांची संख्या 84 हजार नव्हे तर 6 लाख 40 हजार

datta jadhav

सर्वांना माहीत आहे ‘सीमे’ वरील हकीकत : राहुल गांधी

pradnya p
error: Content is protected !!