22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

उत्तराखंडात 1,109 नवे कोरोना रुग्ण; तर 88 जणांना डिस्चार्ज!

ऑनलाईन टीम / देहरादून :


उत्तराखंडात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मागील 24 तासात हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले . त्यामुळे चिंता वाढली आहे. बुधवारी प्रदेशात 1 हजार 109 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 05 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे प्रदेशातील एकूण संख्या 1 लाख 04 हजार 711 इतकी झाली आहे. सद्य स्थितीत 4,526 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल 30,140 नमुने निगेटिव्ह आले. तर देहरादूनमध्ये सर्वात जास्त म्हणजेच 509 नवे रुग्ण आढळून आले. अल्मोडा 3, बागेश्वर 0, चमोली 1, चंपावत 5, हरिद्वार 308, नैनिताल 113, पौडी गडवाल 57, पिथौरागड 0, रुद्रप्रयाग 10, टिहरी 19, उधमसिंह नगर 84 तर उत्तरकाशीमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आला नाही.  


दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1741 ( 1.66 %) रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर कालच्या दिवसात केवळ 88 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आता पर्यंत 96,735 (92.38 %) रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

Related Stories

चार दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये कंठस्नान

Patil_p

‘लॉकडाऊन’संदर्भात मोदी-शहांमध्ये चर्चा

Patil_p

तृणमूल नेत्याची गोळय़ा घालून हत्या

Patil_p

पूर्ण देशासाठी मिळणार ई-पास

Patil_p

कोरोनावरील उपचारासाठी एचआयव्हीच्या ‘या’ औषधांचा होणार वापर

prashant_c

दिल्ली – गाझियाबाद सीमा पुन्हा सील : प्रशासनाचा निर्णय

Omkar B
error: Content is protected !!