तरुण भारत

मुख्यमंत्र्यांचे भाजपमधील मतभेदांबद्दल मौन

बेंगळूर/प्रतिनिधी

मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि एका ज्येष्ठ आमदाराच्या वक्तव्यावर मौन बाळगून आहेत. भाजप आमदार यत्नाळ यांनी मुख्यमंत्री बदलाबाबत बऱ्याच वेळेला वक्तव्य केलं आहे. पुन्हा आमदार यत्नाळ यांनी मी पर्यंत मुख्यमंत्री बदलणार असल्याचे म्हंटले आहे. याआधी ज्येष्ठ मंत्री के.एस. ईश्वरप्पा यांनी त्यांच्या विभागात “हस्तक्षेप” करण्याच्या आरोपावर तसेच आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या वैयक्तिक पातळीवर केलेलया वक्तव्याला उत्तर देण्याचे टाळले आहे, असे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान मुख्यमंत्री येडियुराप्पांवर पक्षतीलच नेत्यांकडून होणारे आरोप आणि टीका याविषयी मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेलं नाही. मुख्यमंत्री आपल्यावर होणाऱ्या आरोपाचे खंडन किंवा पक्षातील नेत्यांना जशास तसे उत्तर देण्याबाबत मौन बाळगून आहेत. याआधी मुख्यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या नेत्यांविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविली होती. पक्षाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. पण अद्याप यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान विधिमंडळ पक्षाचे प्रमुख या नात्याने येडियुरप्पा यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी काही नेत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

Advertisements

Related Stories

बेंगळूर: भारतीय सैन्याने सुरु केले कोविड केअर सेंटर

Abhijeet Shinde

कर्नाटक: ११ जानेवारीपासून गुलबर्गा ते तिरुपती विमान सेवा सुरु

Abhijeet Shinde

शुक्रवारी 1,587 नवे रुग्ण

Amit Kulkarni

कोरोना रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबवा : कुमारस्वामी

Abhijeet Shinde

आमदार मुनिरत्न यांना न्यायालयाचा दिलासा

Amit Kulkarni

आरोग्य केंद्रांचे होणार ‘फायर ऑडिट’

NIKHIL_N
error: Content is protected !!