25 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

मुंबई लोकलवर पुन्हा एकदा निर्बंधाची शक्यता : विजय वडेट्टीवारांचे संकेत

ऑनलाईन टीम / मुंबई :


गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल बंद करण्यात आली होती. मात्र, रुग्ण संख्या कमी झाल्यावर पुन्हा सुरू करण्यात आली होती. आता कोरोना संक्रमणाचा वेग वाढल्याने पुन्हा एकदा लोकल सेवा बंद होऊ शकते असे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पुन्हा एकदा दिले आहेत.


महाराष्ट्रासह राजधानी मुंबईतही कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये  कोरोनाबाधितांची संख्या दररोज 10 हजारांच्या पटीत वाढत असल्याने लोकलवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली आहे.


मुंबईतील लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पूर्णपणे लोकल बंद करावी की, मागच्यावेळी असलेले निर्बंध पुन्हा लागू करावेत, यावर राज्य सरकार विचार करत असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकार आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.  

Related Stories

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात शुक्रवारी 8333 नवे रुग्ण

pradnya p

मराठा आरक्षण : लढा अंतिम टप्प्यात, एसईबीसीसाठी आग्रही

triratna

कोरोनासह साथरोग नियंत्रणाचे ‘आरोग्य’ पुढे आव्हान

triratna

दरोडय़ाच्या गुह्यातील दोन आरोपी जेरबंद

Patil_p

अंत्यसंस्कारासाठी दहा हजाराची मागणी

Patil_p

म्हाडा उभारणार महिलांसाठी वसतिगृह : जितेंद्र आव्हाड

pradnya p
error: Content is protected !!