तरुण भारत

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कोरोनावर मात!

ऑनलाईन टीम / मुंबई : 


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कोरोनावर मात केली असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 27 मार्चला सचिनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार सावधगिरीचा उपाय म्हणून सचिन हॉस्पिटलमध्ये भरती झाला होता. आज सचिन तेंडुलकरला डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबत त्याने ट्वीट करत माहिती दिली.  

Advertisements


सचिननं केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आताच दवाखान्यातून घरी आलो. सध्या विलगीकरणात राहणार असून विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.  पुढे तो म्हणाला, मी सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. ज्यांनी माझी काळजी घेतली. ते खूप कठिण परिस्थितीत आपली सेवा बजावत आहेत, असेही त्याने म्हटले आहे. 

दरम्यान, सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज खेळण्यासाठी छत्तीसगडमध्ये गेला होता. त्या दरम्यान, सचिनला कोरोनाची लागण झाली होती.  सचिनसह अन्य चार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामध्ये एस. बद्रिनाथ, युसुफ पठाण आणि इरफान पठाण यांचा समावेश आहे. 

Related Stories

गुजरातमध्ये इराणी बोटीतून 250 कोटींचे हेरॉईन जप्त

Patil_p

पतंजलीचे ‘कोरोनिल’ 3 दिवसात करते रुग्ण बरा : बाबा रामदेव

datta jadhav

आयर्लंडचा अष्टपैलू केव्हिन ओब्रायन निवृत्त

Patil_p

वीज कोसळून बांगलादेशचे दोन युवा क्रिकेटपटू ठार

Patil_p

अहो आश्चर्यम्! नेटिझन्स चुकले! ‘ती’ महिला नव्हेच!

Patil_p

आशियाई युवा बॉक्सिंग – चोंगथमला सुवर्णपदक

Patil_p
error: Content is protected !!