तरुण भारत

बंगालमध्ये आता ओवैसींची कसोटी

बंगाल विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही उडी घेतली आहे. आयएसएफ प्रमुख फुरफुरा शरीफचे पीरजादा अब्बास सिद्दीकी यांच्याकडून मिळालेल्या झटक्यातून सावरल्यावर ओवैसी स्वबळावर बंगालच्या राजकीय रणात उतरले आहेत. एआयएमआयएमने मुस्लीमबहुल 7 मतदारसंघांमध्ये स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत. अखेरच्या तीन टप्प्यांमध्ये या मतदारसंघात मतदान होणार आहे.

एआयएमआयमच्या तिकीटावर इतहार मतदारसंघात मोफाककार इस्लाम, जलंगीमध्ये अलसोकत जामन, सागरदिघीमध्ये नूरे महबूब आलम, भरतपूर मतदारसंघात सज्जाद हुसैन, मालतीपूरमध्ये मौलाना मोतिउर रहमान, रतुथ मतदारसंघात सईदुर रहमान तर आसनसोल उत्तर मतदारसंघात दानिश अजीज निवडणूक लढवत आहेत.

Advertisements

यातील 3 मतदारसंघांमध्ये यापूर्वी काँग्रेस तर 3 ठिकाणी तृणमूल आणि एका मतदारसंघात डाव्यांचा कब्जा होता. या सर्व मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये ओवैसी यांनी मुस्लीम उमेदवार उतरवून लढत अधिकच चुरशीची केली आहे. काँग्रेस-डाव्यांची आघाडी तसेच तृणमूलने या सर्व मतदारसंघांमध्ये मुस्लीम उमेदवारच उभे केले आहेत.

इतहार मतदारसंघात 52 टक्के मुस्लीम

इतहार मतदारसंघात 6 व्या टप्प्यात मतदान होईल. येथे सुमारे 52 टक्के मुस्लीम मतदार आहेत. 2016 मध्ये या मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या अमल आचार्यजी यांनी विजय मिळविला होता. पण यंदा ममता बॅनर्जी यांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापून मुशर्रफ हुसैन यांना उमेदवारी दिली आहे. ओवैसी यांनीही मुस्लीम उमेदवार उभा करत तृणमूलसमोर आव्हान निर्माण केले आहे.

सागरदिघीमध्ये अधिक प्रमाण

सागरदिघी, मालतीपुर आणि आसनसोल उत्तर तसेच रतुआ मतदारसंघात सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. सागरदिघी मतदारसंघात 65 टक्के मुस्लीम आहेत. येथून तृणमूलचे सुब्रत साहा यांनी सलग दोनवेळा विजय मिळविला आहे. साहा यांच्या विरोधात भाजपने कल्पना घोष यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने मुस्लीम उमेदवार म्हणून अमिनुल इस्लाम यांना संधी दिली आहे. तर ओवैसी यांनीही मुस्लीम उमेदवाराचीच निवड केली आहे.

मालतीपूरमध्ये 3 मुस्लीम उमेदवार

मालतीपूर मतदारसंघात 37 टक्के मुस्लीम मतदार आहेत. येथून मागील वेळी काँग्रेसच्या समर मुखर्जी यांनी विजय मिळविला होता. पण यंदा ते तृणमूलच्या वतीने मैदानात उतरले आहेत. भाजपने या मतदारसंघात अभिषेक सिंघानिया यांना मैदानात उतरविले आहे. काँग्रेसने मुस्लीम उमेदवाराला संधी दिली आहे. ओवैसी यांनीही मुस्लीम उमेदवार उभा करत तृणमूल आणि काँग्रेसच्या अडचणी वाढविल्या आहेत.

जालंगी मतदारसंघ

आठव्या टप्प्यात जालंगी आणि भरतपूर मतदारसंघात मतदान होईल. जालंगीमध्ये 73 टक्के मुस्लीम मतदार आहेत. माकपचे अब्दुल्ल रज्जाक यांनी मागीलवेळी विजय मिळविला होता, पण यंदा ते तृणमूल काँगेसकडून लढत आहेत. अशा स्थितीत डाव्यांनी सैफुल इस्लाम यांना संधी दिली आहे. तर भाजपने चंदन मंडल यांना उमेदवारी दिली आहे. ओवैसी यांनीही मुस्लीम कार्ड खेळून डावे तसेच तृणमूलच्या अडचणींमध्ये वाढ केली आहे.

भरतपूरमध्ये 58 टक्के मुस्लीम

भरतपूर मतदारसंघात 58 टक्के मुस्लीम मतदार आहेत. 2016 मध्ये येथे काँग्रेसच्या कमलेश चटर्जी यांनी विजय मिळविला होता. चटर्जी यावेळीही निवडणूक लढवत आहेत. तृणमूलने हुमाउं कबीर यांना मैदानात उतरविले आहे. तर भाजपकडून कल्याण मुखर्जी मैदानात आहेत. अशा स्थितीत ओवैसी यांनी मुस्लीम उमेदवार देत लढत अधिकच रंजक केली आहे.

आसनसोल उत्तरमध्ये तृणमूल अडचणीत

आसनसोल उत्तर मतदारसंघात सुमारे 20 टक्के मुस्लीम मतदार आहेत. येथे तृणमूल नेते आणि कामगारमंत्री मोलॉय घटक पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. भाजपने कृष्णनेंदु मुखर्जी यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेस-डाव्या आघाडीने हा मतदारसंघ अब्बास सिद्दिकी यांच्या पक्षाला दिला आहे. याठिकाणी आयएसएफकडून मुस्तकीम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येथे ओवैसी यांच्या पक्षाकडून मुस्लिमाला उमेदवारी मिळाली आहे.

Related Stories

इस्त्रोची नववर्षातील आज पहिली मोहीम

Amit Kulkarni

हिंसाचार प्रकरणी आइशी घोषची चौकशी

Patil_p

भारत-नेपाळ यांच्यात प्रकल्प करार

Patil_p

राहुल गांधींनी घेतले माता वैष्णोदेवीचे दर्शन

Amit Kulkarni

कंटेन्मेंट झोनमधील विद्यार्थ्यांना दहावी परीक्षा नाही

Rohan_P

युपी : आणखी दोन दिवस वाढवले लॉकडाऊन!

Rohan_P
error: Content is protected !!