तरुण भारत

शाही हाउसबोटचे अस्तित्व संकटात

20 वर्षांमध्ये 1600 वरून 910 वर आला आकडा

काश्मीरच्या पर्यटनाची ओळख असलेली हाउसबोट अखेरच्या घटका मोजत आहे. डल, नगीन सरोवर आणि झेलम नदीवर तरंगणाऱया लाकडांच्या आलिशान महालांची संख्या 20 वर्षांमध्ये 1600 वरून कमी होत 910 वर आली आहे. 8 महिन्यांमध्ये असे 10 महाल पाण्यात सामावले गेले आहेत. नवी हाउसबोट तयार करण्यास आणि जुन्या हाउसबोटची दुरुस्ती करण्यास बंदी आहे. बहुतांश हाउसबोट 50 वर्षे जुन्या असून काळासोता जीर्ण होत चालल्याची व्यथा हाउसबोट मालक मोहम्मद शरीफ मांडतात.

Advertisements

हाउसबोटच्या दुरुस्तीची परवानगी नसल्यानेच आज केवळ 910 हाउसबोट्सच शिल्लक राहिल्या आहेत. यातील बहुतांशांची स्थिती अत्यंत खराब असून त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे. असेच चालत राहिल्यास एका दशकानंतर एकही हाउसबोट दिसणार नाही. 2009 मध्ये सरोवरांमध्ये प्रदूषणासाठी जबाबदार ठरवत जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने हाउसबोटच्या दुरुस्तीवर बंदी घातली होती. तेवहपासुन पर्यटन विभागासमोर 200 हाउसबोट्सच्या दुरुस्तीचे अर्ज प्रलंबित आहेत.

डल सरोवराच्या बिघडणाऱया स्थितीकरता सरकार हाउसबोटना जबाबदार मानते. पण सरोवराच्या परिसरात शेकडो हॉटेल्स आणि लाखोंची लोकवस्ती आहे. घरांमधील सांडपाणी थेट डल सरोवरात सोडले जाते अशी तक्रार एका हाउसबोटचे मालक  बशीर अहमद यांनी केली आहे. सरोवर स्वच्छ ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येक दिवशी 4.2 कोटी लिटर सांडपाणी सरोवरात मिसळते. यात हाउसबोटची हिस्सेदारी 1 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. अशा स्थितीत केवळ हाउसबोटलाच दुर्दशेसाठी जबाबदार मानणे योग्य नसल्याचे पर्यावरण कार्यकर्ते तारीक अहमद पतलू सांगतात.

Related Stories

नेपाळची अविस्मरणीय सहल

tarunbharat

शांततेच्या मार्गावर काश्मीर

tarunbharat

आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर पोलीसांची कारवाई

Ganeshprasad Gogate

रेल्वे प्रवासी सेवेतील उत्पन्न 71 टक्क्यांनी घटले

Amit Kulkarni

248 आसनी विमानातून एकटय़ाने प्रवास

Amit Kulkarni

अशी ही आगळीवेगळी ठिकाणं

tarunbharat
error: Content is protected !!