तरुण भारत

कपड्यांच्या जागी बँडेजमध्ये नवरा

अनोख्या विवाहाची छायाचित्रे प्रसारित

विवाहाच्या कित्येक महिन्यांपूर्वीच वर आणि वधूच नव्हे तर नातेवाईक देखील त्या दिवशी कुठले कपडे घालायचे हे ठरवून असतात. पण सोशल मीडियावर एका नवऱयाची अशी छायाचित्रे व्हायरल होत आहेत, जी पाहून लोक हैराण आहेत. इंडोनेशियातील एका विवाहसोहळय़ात वर केवळ शॉर्ट्समध्ये दिसून आला आहे. तर पारंपरिक पोशाखात वधू अत्यंत सुंदर दिसून येत हाती. विवाहाच्या काही दिवसांपूर्वी नवऱयामुलाचा अपघात झाला आणि यामुळे त्याला शस्त्रक्रियेला तोंड द्यावे लागले आहे. याचमुळे नवरा मुलगा शॉर्ट्समध्ये दिसून आला आहे. या छायाचित्रांना सोशल मीडियावर 14.5 हजार लाइक्स आणि अडीच हजारांपेक्षा अधिक रीट्विट मिळाले आहेत. तसेच शेकडो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रकृती पूर्ण बरी होईपर्यंत विवाह लांबणीवर टाकणे योग्य ठरले असते अशी प्रतिक्रियाही उमटली आहे.

Advertisements

इंडोनेशियाच्या पूर्व जावा भागात हा विवाह पार पडला आहे. यात नवऱया मुलाला केवळ शॉर्ट्स आणि बँडेजमध्ये दिसून येतो. कपडय़ांच्या नावावर त्याने केवळ ‘लुंगी’ घातली आहे. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी बँडेजही आहे. तसेच एका हातावर प्लास्टर घातले गेले आहे. खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्याने तो विशेष पेहराव करू शकला नव्हता. तर समाजमाध्यमांवर अनेक जण त्याची थट्टा करत आहेत, तर वधूची हिंमत आणि निश्चयाला सलामन करत आहेत. कारण अशा स्थितीतही विवाह करणे मोठी गोष्ट आहे ना?

Related Stories

चित्रपट निवडताना आईचा घेते सल्ला

Patil_p

डिजिटल डेब्यू करणार धकधक गर्ल

Patil_p

तुझं माझं अरेंज मॅरेजमध्ये प्रीतम कागणे

Patil_p

शाहरूख खानच्या क्लास ऑफ 83 मध्ये मराठमोळा पृथ्विक प्रताप

Patil_p

‘ओएमजी2’मध्ये दिसणार यामी गौतम

Patil_p

अनिल कपूरने दिलं महागडं गिफ्ट

Patil_p
error: Content is protected !!