तरुण भारत

कोरोनाचा विस्फोट : भोपाळ एम्स रुग्णालयातील 24 डॉक्टर पॉझिटिव्ह

  • शहर क्षेत्रात आजपासून साप्ताहिक लॉकडाऊन


ऑनलाईन टीम / भोपाळ : 


मध्यप्रदेशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस उच्चांकी संख्या आढळून येत आहे. राजधानी भोपाळमध्ये तर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. भोपाळ एम्स रुग्णालयातील 24 डॉक्टरांनाच कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी 184 मधील 102 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यामध्ये 24 डॉक्टरांचा समावेश आहे. ह्या माहितीनंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे.

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांवर घालून दिलेल्या नियमावलीनुसार उपचार केला जात आहे. दरम्यान, मागील 24 तासात प्रदेशात 4,882 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर आतापर्यंत 4136 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यातील 23 मृत्यू हे 8 एप्रिल रोजी झाले आहेत. सद्य स्थितीत 30,486 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

  • अनेक जिल्ह्यात पूर्ण लॉकडाऊन !

आज सायंकाळी 6 वाजल्यापासून प्रदेशातील सर्व शहरांमध्ये साप्ताहिक लॉकडाऊन जारी केले जाईल. मात्र, रतनाम जिल्ह्यात 9 दिवस आणि छिंदवाडा खरगोन, बैतूल 7 दिवस पूर्ण बंद असेल. तर कोलारमध्ये देखील आजपासून 9 दिवसांचे लॉक डाऊन करण्यात आले आहे. 

Related Stories

उत्तराखंड : गुरुवारी 7,127 कोरोना रुग्णांची नोंद;122 मृत्यू

Rohan_P

मध्यप्रदेश : बस दुर्घटनेत 46 प्रवाशांचा मृत्यू

datta jadhav

ओमिक्रॉनमुळे भारतावर पुन्हा आर्थिक संकट ?

Sumit Tambekar

हेरगिरीसाठी सोडलेले पाकिस्तानातील कबुतर ताब्यात

datta jadhav

नीरव मोदीच्या पत्नीविरोधात इंटरपोल वॉरंट

Patil_p

लोकांना वीज-पाण्यासह मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन

Patil_p
error: Content is protected !!