तरुण भारत

बसमधून नियमबाह्य कामगारांची वाहतूक; ‘इंडिया गारमेंट’ला ३० हजारांचा दंड

कुपवाड / प्रतिनिधी 

कोरोना काळात शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कंपनीच्या कामगारांची बसमधून गर्दीने व नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या कुपवाड एमआयडीसीतील इंडिया गारमेंट या कंपनीला शुक्रवारी तब्बल ३० हजाराचा दंड ठोठावण्यात आला.

कुपवाड महापालिका प्रशासन आणि कुपवाड पोलिसांच्या पथकाने तपासणी करून संयुक्तरित्या ही कारवाई केली. कंपनीच्या बसमध्ये नियमापेक्षा जादा कामगारांची वाहतूक करताना आढळून आल्याने कंपनीकडून ३० हजाराचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक निरज उबाळे व  सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी दिली. 

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर शासनाने कड़क निर्बंध लादले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासन व कुपवाड पोलिसांच्या संयुक्त पथकाने येथील सोसायटी चौकात नाकाबंदी केली आहे. दररोज वाहनचालक व पादचारी यांची तपासणी सुरू होती. यावेळी कुपवाड एमआयडीसीतील इंडिया गारमेंट कंपनीची कामगार वाहतूक करणारी बस आली.

या बसची तपासणी करताना बसमध्ये नियमबाह्य कामगारांची संख्या आढळून आली. कंपनीच्या बसचालकाने कोरोना कालावधीत शासनाने दिलेल्या आदेशाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.पोलिस व महापालिका प्रशासनाने कंपनीच्या बसचालकाला ३० हजार रुपयांचा दंड करून तो वसूल केला. या कारवाईत महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक, समन्वयक, मुकादम व पोलिस कर्मचारी सहभागी होते.

Related Stories

मिरज-मालगांव रस्त्यावर 20 ते 25 भटक्या कुत्र्यांचा बालिकेवर हल्ला

Abhijeet Shinde

मिरजेच्या संगीत महोत्सवांचे ‘सीमोल्लंघन’

Sumit Tambekar

UPSC परीक्षेत इस्लामपूरच्या निमिष पाटीलचे यश

Abhijeet Shinde

सांगली : ताकारी योजनेची विकासकामे ठप्प

Abhijeet Shinde

सांगली जिल्हा अंतर्गत २९१ पोलिसांच्या बदल्या

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेतील सहा अट्टल गुन्हेगारांना लागणार मोक्का

Abhijeet Shinde
error: Content is protected !!