तरुण भारत

चेन्नई सुपरकिंग्ज संघात बेहरेनडॉर्फचा समावेश

वृत्तसंस्था/ मुंबई

14 व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला चेन्नई शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत खेळणाऱया बलाढय़ चेन्नई सुपरकिंग्ज संघामध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फचा समावेश करण्यात आला आहे. चेन्नई संघातील ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज हॅझलवुडने या स्पर्धेतून माघार घेतल्याने त्याच्या जागी बेहरेनडॉर्फला संधी देण्यात आली आहे.

Advertisements

बेहरेनडॉर्फने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 11 वनडे आणि 7 टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. बेहरेनडॉर्फ दुसऱयांदा आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे. यापूर्वी म्हणजे 2019 साली त्याने आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. 2019 च्या आयीपीएल स्पर्धेत त्याने 5 सामन्यात 5 बळी मिळविले होते. 30 वर्षीय हॅझलवुडने गेल्यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेत तीन सामन्यात चेन्नई संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. चेन्नई संघाचा 2021 च्या आयपीएल स्पर्धेतील सलामीचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाबरोबर शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

Related Stories

ऑस्ट्रेलियन आयपीएलवीर अखेर घरी परतले…

Amit Kulkarni

युरोपियन चॅम्पियनशिप्स, स्विस ओपन स्पर्धा रद्द

Patil_p

भारतीय महिलांना 5 सुवर्णपदके

Patil_p

2 नव्या आयपीएल संघांना 24 डिसेंबरला मंजुरी शक्य

Patil_p

विंडीजचा सराव सामना : रेमन रिफेरचे 11 चेंडूत 5 बळी

Patil_p

झेक प्रजासत्ताकची क्रेसिकोव्हा ‘फ़्रेंच सम्राज्ञी’

Patil_p
error: Content is protected !!