तरुण भारत

नागपुरात कोविड रुग्णालयाला आग; 4 जणांचा मृत्यू

  • पंतप्रधानांकडून ट्विट करत शोक व्यक्त 


ऑनलाईन टीम / नागपूर : 


नागपूरच्या वेल ट्रीट कोरोना रुग्णालयात काल रात्री आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर प्रमाणत जखमी झाले आहेत. मृत व्यक्तींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. 

Advertisements


शाॅट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागली तेव्हा या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार चालू होते. आग लागल्याने सगळीकडे मोठा गोंधळ उडाला. रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आले. यावेळी रुग्णालयातील 27 गंभीर रुग्णांना सरकारी मेडिकल कॉलेज आणि इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. 


या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. ते नागपूर रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे मी दु: खी आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांबद्दल माझ्या संवेदना आहेत. या घटनेत जखमी लोक लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. 


नागपूर नगम निगमचे प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले की, रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील आयसीयूच्या एसी युनिटमध्ये पहिल्यांदा आगीला सुरुवात झाली. या आगीत 4 जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आणि काही काळाने आगीवर नियंत्रण मिळवले. 

Related Stories

मराठा आरक्षणासाठी नक्षलवाद्यांनी काढलं पत्रक, खासदार संभाजीराजे म्हणाले…

Abhijeet Shinde

अमेरिकेकडून लष्करी ड्रोन निर्यातीचे निकष शिथिल

datta jadhav

कर्नाटक सरकार २०२३-२४ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणारे पहिले राज्य असेल: मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

कोल्हापूर :ऑनलाईन बुकींगसह नियमांचे पालन करत जिल्हाधिकाऱ्यांनी सपत्निक घेतले अंबाबाईचे दर्शन

Abhijeet Shinde

सोलापूर : बार्शीत रामलल्ला भूमिपूजनचे जल्लोषात स्वागत

Abhijeet Shinde

कण्हेरमध्ये झाले आतापर्यत 54 बाधित

Patil_p
error: Content is protected !!