तरुण भारत

‘या’ लसीबाबत संभ्रम कायम; अनेक देशात निर्बंध

ऑनलाईन टीम :  

ॲस्ट्राझेनेकाची कोरोना प्रतिबंधक लस आणि शरीरात होणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या यांच्यातील संबंध युरोपच्या औषध नियामकाने उघड केले होते. त्यानंतरही या लसीच्या वापरावर अनेक देशांनी निर्बंध घातले आहेत. ब्रिटनमध्ये 30 वर्षांखालील लोकांना ही लस दिली जात नाही. इटली आणि स्पेनमध्ये केवळ 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी ही लस देण्यात येते. ऑस्ट्रेलियाने 50 वर्षांखालील लोकांना ही लस न घेण्याचा सल्ला दिला आहे. 

Advertisements

युरोपियन मेडिकल एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिलपर्यंत मेंदूशी संबंधित रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठण्याचे (सीव्हीएसटी) 169 रुग्ण आढळले होते. दुसरीकडे, पोटाच्या नसांमध्ये गुठळ्या झालेली 53 प्रकरणे आढळली होती. युरोप आणि यूकेमध्ये 3.4 कोटी लोकांना लसीकरण झाल्यानंतर ही संख्या उघडकीस आली आहे.

दरम्यान, ॲस्ट्राझेनेकाची कोरोना लस घेतल्यानंतर धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होत असल्याचे समोर आल्यानंतर युरोपातील डझनभर देशांनी या लसीचे लसीकरण तात्पुरत्या काळासाठी थांबविले होते. त्यानंतर ही लस सुरक्षित आणि प्रभावी असून, लसीचा आणि रक्तात गुठळ्या होण्याचा काहीही संबंध नाही, असे युरोपियन युनियनच्या औषध नियामक मंडळाने स्पष्ट केले होते. त्यानंतर ही या लसीच्या वापरावर काही देशांनी निर्बंध घातले आहेत.

Related Stories

कोरोना संसर्गावरील उपचारात स्टॅटिन्स प्रभावी

Patil_p

शासकीय जंगलातील सागवान चोरांच्या मुसक्या आवळल्या

Abhijeet Shinde

तैवानची कोरोनावर मात

tarunbharat

अशरफ गनी, अमरुल्ला सालेह यांनाही ‘माफी’

Patil_p

अश्वगंधा’ वनस्पती पोहचली आंतरराष्ट्रीय पातळीवर

Patil_p

इटली : स्थिती धोकादायक

Omkar B
error: Content is protected !!