तरुण भारत

कोरोना नियमांचे उल्लंघन, नॉर्वेच्या पंतप्रधानांना 1.70 लाखांचा दंड

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :  

कोरोना नियमावलीचे पालन न केल्याने नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांना नॉर्वे पोलिसांनी 20 हजार नॉर्वेजियन क्राऊन म्हणजेच भारतीय चलनानुसार 1 लाख 70 हजारांचा दंड ठोठावला आहे. कोरोना नियम तोडल्याने एखाद्या पंतप्रधानांवर कारवाई होण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे.  

Advertisements

नॉर्वेत कोरोना नियमावली कडक असून, एखाद्या कार्यक्रमात 10 व्यक्तींच्यावर एकही व्यक्ती सहभागी होऊ शकत नाहीत. मात्र, सोलबर्ग यांनी फेब्रुवारी अखेर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एका रिसॉर्टमध्ये 13 नातेवाईकांसह 60 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी या प्रकाराबद्दल माफीही मागितली होती. मात्र, सोलबर्ग यांच्यावर टिका झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.

Related Stories

पत्रकाराच्या अटकेसाठी विमान हायजॅक

datta jadhav

आगीमुळे बुडाली इराणची ‘खर्ग’ युद्धनौका

datta jadhav

व्हिसा फ्रॉडप्रकरणी चिनी लष्कराशी संबंधित महिला शास्त्रज्ञाला अमेरिकेत अटक

datta jadhav

ब्राझीलमध्ये कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर

Patil_p

400 वर्षांनी ‘स्वतंत्र’ झाला बार्बाडोस

Patil_p

लसीसाठी WHO ने भारताकडे मागितली मदत

datta jadhav
error: Content is protected !!