तरुण भारत

4 मतदान केंद्रांवर 20 रोजी पुर्नमतदान

निवडणूक आयोगाचा निर्णय- आसाममधील मतदान केंद्रे

आसाममध्ये दुसऱया टप्प्यातील मतदान एक एप्रिल रोजी पार पडले होते. या टप्प्यातील 4 मतदान केंद्रांवर निवडणूक आयोग पुन्हा मतदान करविणार आहे. 1 एप्रिल 2021 रोजी चार मतदान केंद्रांवर झालेले मतदान शून्य ठरविण्यात यावे असा निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. याचबरोबर आयोगाच्या निर्देशांनुसार संबंधित मतदान केंद्रांवर नव्याने 20 एप्रिल रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करविण्यात येणार आहे.

Advertisements

भाजप उमेदवाराच्या पत्नीशी संबंधित कारमध्ये ईव्हीएम मिळाल्यावर रताबाडी (राखीव) विधानसभा मतदारसंघातील इंदिरा एमव्ही शाळेत मतदान केंद्र क्रमांक 149 पुन्हा मतदान करविण्यात येणार असल्याचे आयोगायच आदेशात म्हटले गेले आहे.

हाफलोंग मतदारसंघातील कोठलिर एलपी शाळेत मतदान केंद्र क्रमांक 107 (अ) 90 मतदारच नोंदणीकृत होते, पण तेथे एकूण 171 मते पडली होती. सोनाई विधानसभा मतदारसंघातील मध्य धनेहोरी एलपी शाळेत मतदान केंद्र 463  येथेही नव्याने मतदान करविण्याचा आदेश देण्यात आला आहे. येथे गोळीबाराच्या घटनेत किमान 3 जण जखमी झाले होते.

Related Stories

विवाहसोहळा पडला महागात, सर्वात मोठा दंड

Patil_p

दोषी मुकेशचा तुरुंगात लैंगिक छळ : वकिलांचा दावा

prashant_c

36 केंद्रीय मंत्री भ्याड : मणिशंकर अय्यर

Patil_p

भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार ‘ध्रुवास्त्र’

datta jadhav

पुन्हा 29 डिसेंबरला वाटाघाटी

Patil_p

जम्मूच्या शेतकऱयांसाठी बीएसएफचा पुढाकार

Patil_p
error: Content is protected !!