तरुण भारत

5 व्या टप्प्यात 79 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

65 उमेदवार कोटय़ाधीश- 125 उमेदवार केवळ 5-12 वी पास

बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 308 उमेदवारांपैकी 79 जणांच्या विरोधात गुन्हे नोंद आहेत. यातील 65 जणांच्या विरोधात अत्यंत गंभीर गुन्हे आहेत. यापैकी 28 उमेदवार भाजपचे, तृणमूलचे 18 तर माकपचे 10 आणि काँग्रेसचे 2 उमेदवार आहेत. पाचव्या टप्प्यातील 65 उमेदवार कोटय़ाधीश असून यातील तृणमूलचे 23, भाजपचे 18 आणि काँग्रेसचे 5 तसेच माकपचे 3 उमेदवार  आहेत. या टप्प्यातील उमेदवारांची सरासरी मालमत्ता 81.76 लाख रुपये आहे.

Advertisements

काँग्रेसचा उमेदवार धनाढय़

नदिया जिल्हय़ातील शांतिपूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रित्जू घोषाल पाचव्या टप्प्यातील सर्वात धनाढय़ उमेदवार आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची मालमत्ता 19 कोटी 47 लाख 05 हजार 304 रुपयांची आहे. दुसरीकडे दार्जिलिंग मतदारसंघातील अपक्ष उमेदवार एनजी शेर्पा आणि सिलिगुडीतील संजद उमेदवार भूषण कुमार सोनी यांची शून्य मालमत्ता आहे.

शिक्षणाची पातळी

पाचव्या टप्प्यात 125 उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक पात्रता 5 वी ते बारावीदरम्यान असल्याचे नमूद केले आहे. तर 182 उमेदवारांनी पदवीधर तसेच त्याहून अधिक शिक्षण घेतल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला आहे.  112 उमेदवार हे 25-40 वयोगटातील तर 156 उमेदवारांनी स्वतःचे वय 41-60 वर्षांदरम्यान असल्याचे म्हटले आहे. तर 50 उमेदवारांचे वय 61-80 वर्षांदरम्यान आहे.

Related Stories

दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस हुतात्मा

Patil_p

दरातील घसरणीमुळे सोने ग्राहकात उत्साह

Patil_p

बेंगळूरमध्ये वाढदिवस कार्यक्रमात स्फोट

Patil_p

सिंघू बॉर्डरवर स्थिती तणावपूर्ण

Patil_p

पक्षविरोधी वक्तव्याप्रकरणी TMC नेते कनिष्क पांडा निलंबित

datta jadhav

राज्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण घटले

Patil_p
error: Content is protected !!