तरुण भारत

मायनिंग सिटी किरुनाची व्यथा

100 वर्षांपूर्वी झालेल्या खननामुळे जमीन खचली, नागरिकांची घरे आता हलविण्याची वेळ

स्वीडनच्या 130 वर्षे जुन्या किरुना टाउनसाठी वरदानच अभिशाप ठरला आहे. यामुळे येथील 300 घरांना तीन किलोमीटर अंतरावर हलविण्याची वेळ आली आहे. किरुना टाउन जगाती मायनिंग सिटीच्या नावाने प्रसिद्ध आहे. येथील भूगर्भात लोहखनिजाचा प्रचंड साठा आहे. येथील एका खाणीत दिवसभरात 6 आयफेल टॉवरच्या मूल्याइतके लोहखनिज प्राप्त केले जाते.

Advertisements

निसर्गाच्या या वरदानामुळे मायनिंग कंपन्यांनी येथे तळ ठोकला आहे. मागील 100 वर्षांमध्ये इथे झालेल्या प्रचंड उत्खननामुळे 20 हजार लोकसंख्या असलेली ही वस्ती आता भूगर्भात सामावू लागली आहे. संकट पाहता स्वीडन सरकार सर्व घरांना अन्यत्र हलवून खाणींना वाचवू पाहत अताहे. पण ज्या इमारतींचे स्थलांतर करता येणार नाही, त्यांना जमीनदोस्त करून सरकार हुबेहुब इमारती नव्या वसाहतीत तयार करत आहे.

स्वीडन सरकारने 2013 मध्ये घरांना हलविण्याची योजना आखली होती. ही योजना 20178 मध्ये लागू करता आली आहे. मागील 4 वर्षांमध्ये सुमारे 20 टक्के घरांचे स्थानांतरण झाले आहे. आगामी 10 ते 15 वर्षांमध्ये नवे किरुना टाउन तयार होणार असल्याचा स्वीडन सरकारचा दावा आहे.

Related Stories

300 मजुरांना बाधा

Patil_p

वेस्ट बँकेत 800 नवीन घरे बांधण्याची इस्रायलची घोषणा

Patil_p

भारताची रॅपिड रिसपॉन्स टीम कुवेतमध्ये

prashant_c

शरीरातील कोरोनाचा ‘मित्र अन् शत्रू’ उघड

Patil_p

दिवाळी दाखविणार कोरोनावर मात करण्याचा मार्ग

Patil_p

महिनाभर टाळेबंदी

Patil_p
error: Content is protected !!