तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात`कोविशिल्ड’चे 1 लाख डोस उपलब्ध

अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उषादेवी कुंभार यांची माहिती

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

जिल्हा आरोग्य विभागाकडे शनिवारी सकाळी `कोविशिल्ड’ लसीचे 1 लाख डोस शासनाकडून उपलब्ध झाले. जिल्हयातील सर्व लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड चा पुरवठा करण्यात आला आहे. रविवारी (दि.11) पासून सर्व केंद्रांवर नियमित लसीकरण होणार आहे. अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उषादेवी कुंभार यांनी दिली.

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यभर लसीकरण मोहिम युध्दपातळीवर राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात केंद्राकडून पुरवठा झालेला लस संपल्याने राज्यात तुटवडा निर्माण झाला. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्हयातही कोरोना लस संपल्याने लसीकरण मोहिम ठप्प झाली होती. यामुळे प्रशासनासह नागरिकांचे लसींचा पुरवठा कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले होते. लस संपल्याने अनेकांना चिंता लागून राहिली होती. मात्र, शनिवारी सकाळी दहा वाजता जिल्हा आरोग्य विभागाकडे 1 लाख कोविशिल्ड डोस शासनाकडून उपलब्ध झाले आहेत. यापैकी 98 हजार 500 डोसचा शहरासह जिल्हयातील सर्व लसीकरण केंद्रांवर पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे ठप्प झालेली लसीकरण मोहिम पुन्हा पूर्ववत होणार आहे.

Related Stories

पुरबाधीत सभासदांना छत्रपती राजाराम साखर कारखाना क्रेडीटवर ऊस बियाणे देणार

Abhijeet Shinde

खाजगी सावकारांवर सहकार विभागाच्या धाडी

Abhijeet Shinde

भाळणे म्हणजे प्रेम नव्हे,तर सांभाळणे म्हणजे प्रेम

Abhijeet Shinde

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोना रुग्णांत वाढ, आज 1 हजार 855 नवे पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

आठवड्यानंतर रेल्वे सेवा सुरु

Abhijeet Shinde
error: Content is protected !!