तरुण भारत

कोरोना प्रतिबंधक नियमावली पाळा!

केंद्रीय निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

राजकीय प्रचारादरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली पाळण्याचा सल्ला केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिला आहे. नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस पाठवून ठणकावल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. कोरोना काळात सर्व नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले आहे. तशा आशयाचे पत्र सर्व राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना निवडणूक आयोगाने पाठवले आहे.

गेल्या काही दिवसात देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पण ज्या राज्यात निवडणूक आहे त्या राज्यात कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नाही, त्या नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या नियमांचे पालन केले नाही तर सर्व राजकीय पक्ष, नेते, स्टार प्रचारक आणि उमेदवारांच्या सभा आणि रॅलीवर बंदी आणण्यात येईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. सभा किंवा निवडणूक रॅली असेल, त्या काळात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन केले नाही तर वेगवेगळय़ा नियमांच्या आधारे कारवाई करण्यात येईल, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

दोन दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी राजकीय नेते, पक्ष कोरोनाच्या नियमांचे पालन का करत नाहीत असे विचारत केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला एक नोटीस पाठवली होती. या दणक्यानंतर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना लेखी नोटीस पाठवत सर्व सूचनांची कडक अंमलबजावणी करण्याचा सल्ला दिला आहे.

Related Stories

कररचनेतून दिलासा देण्याचा प्रयत्न

Patil_p

कोरोनाने मोडले सर्व रेकॉर्ड! गेल्या 24 तासात 3.15 लाख नवे रुग्ण; 2,104 मृत्यू

pradnya p

शहरातून गावात पाठविल्या जाणाऱया रकमेत घट

Patil_p

शौर्य क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीचे यशस्वी प्रक्षेपण

datta jadhav

उत्तर प्रदेश : ट्रक अपघातात 24 मजूर ठार, 15 जण गंभीर जखमी

pradnya p

एमएसपी अंतर्गत धान्य खरेदीवर भर

Patil_p
error: Content is protected !!