तरुण भारत

अमेरिकन युद्धनौकेचा लक्षद्वीपजवळ सराव

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अमेरिकन नौदलाने दादागिरी करून भारताच्या समुद्र हद्दीत घुसून लक्षद्वीपजवळ युद्धनौकेने सराव केल्याचे उघड झाले आहे. यासाठी आम्हाला पूर्व परवानगी घेण्याची गरज नाही, अशी धक्कादायक भूमिका अमेरिकेने व्यक्त केल्यानंतर सरकारच्या धोरणांवर टीका होत आहे. 7 एप्रिलला अमेरिकेची युद्धनौका युएसएस जॉन पॉल जोन्सने भारताची परवानगी न घेता लक्षद्वीपपासून 130 समुद्र मैल अंतरावर भारताच्या हद्दीत घुसून सराव केला. ही युद्धनौका क्षेपणास्त्रभेदी असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे.

Advertisements

अमेरिकेच्या सातव्या आरमाराने यासंबंधी एक वक्तव्य जारी केले आहे. अमेरिकन नौदलाने केलेली ही कृती आंतरराष्ट्रीय कायद्यांना धरून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विशेष आर्थिक क्षेत्रातून जाण्यासाठी अथवा युद्धसराव करण्यासाठी पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याचा दावा भारत करत असला तरी आपली कृती आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार योग्य असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

Related Stories

सातारा : राज्य शासन सोयाबीन 3880 रुपये हमी भावाने घेणार ; 15 ऑक्टोबर पासून खरेदी केंद्रे सुरु होणार : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील

triratna

देशातील पहिल्या ड्रायव्हरलेस मेट्रो कारचे संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Shankar_P

जाण्या येण्यासाठी ग्रामपंचायतीत नोंदणी करा

triratna

बुधवारी जिल्हय़ात 357 नवे रुग्ण दहा जण दगावले, बेळगाव शहरात दीडशे बाधित

Rohan_P

महिला क्रिकेटकडे बीसीसीआयने लक्ष पुरवावे

Omkar B

मेहबुबांच्या विधानावर भाजप कार्यकर्ते संतप्त

Patil_p
error: Content is protected !!