तरुण भारत

कोरोनावरील उपचारात नेझल स्प्रे प्रभावी

परीक्षण यशस्वी ठरल्याचा दावा

वृत्तसंस्था / लंडन

Advertisements

कोरोना महामारीचा तडाखा अद्याप जगाला बसत आहे. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे बाधितांवरील उपचाराचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या स्थितीत ब्रिटनमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एका वैद्यकीय परीक्षणात ‘सॅनोटाइज’द्वारे कोरोनावर प्रभावी उपचार करण्यास मिळाले आहे.

सॅनोटाइज हे नेझल स्प्रे आहे. सॅनोटाइजच्या वापरानंतर कोरोनाबाधितांमधील विषाणूचा प्रभाव 24 तासांमध्ये 95 टक्के आणि 72 दिवसांमध्ये 99 टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले आहे. हे वैद्यकीय परीक्षण ‘सॅनोटाइज रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ आणि ब्रिटनच्या ‘ऍशफोर्ड अँड पीटर्स हॉस्पिटल्स’ने केले आहे. शुक्रवारी या परीक्षणाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

सॅनोटाइज नेझल स्प्रे सुरक्षित आणि प्रभावी अँटीव्हायरल उपचार असल्याचे दिसून आले आहे. याच्या मदतीने कोरोनाचा संसर्ग रोखता येणे शक्य होणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे. या नेझल स्प्रेमुळे विषाणूची तीव्रता कमी होऊ शकते. तसेच संसर्ग झालेल्या रुग्णांनाही मोठा दिलासा मिळू शकतो.

वैद्यकीय परीक्षणादरम्यान सॅनोटाइज नेझल स्पेचा कितपत परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला. नेझल स्प्रेच्या वापरामुळे 75 रुग्णांमधील कोविड-19 विषाणूचा प्रभाव कमी झाला. पहिल्या 24 तासांमध्ये सरासरी व्हायरल लॉग कमी होत 1.362 इतका झाला आहे. तर विषाणूचा व्हायरल लोड जवळपास 95 टक्क्यांनी कमी झाला आणि 72 तासांमध्ये व्हायरल लोड 99 टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले आहे. परीक्षणात सहभागी बहुतांश कोरोनाबाधितांना ब्रिटनच्या संकरावताराची लागण झाली होती. कोरोनाचा हा संकरावतार घातक मानला जातो. या वैद्यकीय परीक्षणादरम्यान कुठलाच साईड इफेक्ट आढळून आलेला नाही.

Related Stories

‘अँटिबॉडिज’सह मुलीचा जन्म!

datta jadhav

नवाज शरीफ भारताचे एजंट : शेख रशीद

datta jadhav

पाकिस्तानमध्ये बुद्धांच्या मूर्तीची विटंबना, तिघांना अटक

datta jadhav

भारतीय महिला संयुक्त राष्ट्र महासचिवपदाच्या शर्यतीत

Patil_p

‘ख्रिसमस बबल’

Patil_p

आलावी होणार इराकचे नवे पंतप्रधान

Patil_p
error: Content is protected !!