तरुण भारत

उत्तर प्रदेशात अपघातात 12 भाविकांचा मृत्यू

इटावा / वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशमधील इटावा जिह्यातील बडपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिहौलीजवळ भाविकांनी भरलेल्या डीसीएम-टेम्पोला झालेल्या अपघातात 12 भाविकांचा मृत्यू झाला. तसेच 41 लोक जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व भाविक आग्रा जिह्यातील पिनाहटहून इटावा लखना येथे असलेल्या कालकादेवी मंदिरात ध्वजारोहण करण्यासाठी जात होते. देवदर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱया टेम्पोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे जिल्हाधिकारी श्रुती सिंग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. ब्रिजेश कुमार सिंह यांनी स्पष्ट केले. अपघातग्रस्तांना प्रशासनाच्यावतीने योग्य मदत पुरविण्यात आली. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेतील मृतांच्या वारसांना 2 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींपैकी दोन भाविकांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

जप्त केलेली रक्कम नेण्यासाठी मागविला कंटेनर

Abhijeet Shinde

संभाजीराजेंच्या दिल्लीतील सरकारी बंगल्यात शिरलं पाणी

Abhijeet Shinde

तिसऱया दिवशीही 5 हजारहून अधिक रुग्ण

Patil_p

लसीसाठी तीन-चार महिन्यांची प्रतीक्षा

Patil_p

भुयारी मार्गाद्वारे घुसखोरीचा डाव उघड

Patil_p

अखेर फारुख अब्दुल्ला यांची नजरकैद्येतून सुटका

tarunbharat
error: Content is protected !!