तरुण भारत

दिल्ली ‘स्टार’, शॉ-धवन ‘सुपरस्टार’!

आयपीएल साखळी सामना- दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईला लोळवले

मुंबई / वृत्तसंस्था

Advertisements

सामनावीर शिखर धवन (54 चेंडूत 85) व पृथ्वी शॉ (38 चेंडूत 72) यांनी दणकेबाज फटकेबाजी करत 138 धावांची दमदार सलामी दिल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल साखळी सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा तब्बल 7 गडी राखून फडशा पाडला. प्रारंभी, चेन्नईने सुरेश रैनाच्या (36 चेंडूत 54) तडफदार अर्धशतकामुळे 20 षटकात 7 बाद 188 धावांचा डोंगर जरुर रचला. पण, धवन व शॉ या जोडीनेच 13.3 षटकात 138 धावांची शतकी सलामी दिली आणि त्यानंतर दिल्लीचा विजय ही निव्वळ औपचारिकता होती.

विजयासाठी 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने 18.4 षटकात 3 गडय़ांच्या बदल्यात 190 धावांसह सहज, एकतर्फी विजय नोंदवला. शॉच्या खेळीत 9 चौकार, 3 षटकार तर धवनच्या खेळीतही 10 चौकार व 2 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला. या दोघांच्या धडाकेबाज खेळीसमोर चेन्नईकडे काहीच ठोस प्रत्युत्तर नव्हते आणि नामुष्कीजनक पराभव पत्करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय बाकी राहिला नाही.

तत्पूर्वी, सुरेश रैनाच्या दमदार आयपीएल पुनरागमनामुळे चेन्नईने 200 धावांच्या उंबरठय़ापर्यंत सहज मजल मारली. डावखुऱया रैनाने 36 चेंडूत 54 धावांची आतषबाजी करताना 3 चौकार व 4 उत्तुंग षटकार फटकावले. चेन्नईने शेवटच्या 5 षटकात 52 धावा झळकावल्या, त्यावेळी सॅम करणच्या फटकेबाजीचा वाटा मोलाचा राहिला.

दिल्ली कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला पाचारण केल्यानंतर ऋतुराज गायकवाड (5) व प्लेसिस (0) स्वस्तात बाद झाल्याने चेन्नईची खराब सुरुवात झाली. अवेश खानने (4 षटकात 2-23) दुसऱयाच षटकात दिल्लीला पहिले यश मिळवून दिले आणि त्यानंतर ऋतुराजही स्वस्तात बाद झाला.

पुढे, मोईन अली व रैना ही जोडी क्रीझवर जमली आणि या उभयतांनी तिसऱया गडय़ासाठी 53 धावा फलकावर लावल्या. मोईन अली तिसऱया गडय़ाच्या रुपाने बाद झाल्यानंतर रैना व रायुडू या जोडीने चौथ्या गडय़ासाठी 63 धावांची भागीदारी साकारली. मोईन अलीने 24 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 36 धावांचे योगदान दिले. अनुभवी रविचंद्रन अश्विनने मोईन अलीची खेळी संपुष्टात आणली. थर्डमॅनवरील धवनने मोईनचा अप्रतिम झेल टिपला.

पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजीवर भर देणाऱया अम्बाती रायुडूने 16 चेंडूत जलद 23 धावा केल्या. रैनाने वोक्स, अश्विन, मिश्रा यांचा पुढे सरसावत उत्तम समाचार घेतला. मात्र, नंतर रविंद्र जडेजासमवेत (26) समन्वयात गोंधळ उडाल्यानंतर त्याला धावचीत होत परतावे लागले. ख्रिस वोक्स (2-18), अवेश खान (2-23) यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

धावफलक

चेन्नई सुपरकिंग्स ः ऋतुराज गायकवाड झे. धवन, गो. वोक्स 5 (8 चेंडूत 1 चौकार), फॅफ डय़ू प्लेसिस पायचीत गो. अवेश खान 0 (3 चेंडू), मोईन अली झे. धवन, गो. अश्विन 36 (24 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), सुरेश रैना धावचीत (वोक्स-पंत) 54 (36 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), अम्बाती रायुडू झे. धवन, गो. करण 23 (16 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), रविंद्र जडेजा नाबाद 26 (17 चेंडूत 3 चौकार), महेंद्रसिंग धोनी त्रि. गो. अवेश खान 0 (2 चेंडू), सॅम करण त्रि. गो. वोक्स 34 (15 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार). अवांतर 10. एकूण 20 षटकात 7 बाद 188.

गडी बाद होण्याचा क्रम

1-7 (प्लेसिस, 1.4), 2-7 (ऋतुराज, 2.1), 3-60 (मोईन अली, 8.3), 4-123 (रायुडू, 13.5), 5-137 (रैना, 15.1), 6-137 (धोनी, 15.3), 7-188 (सॅम करण, 19.6).

गोलंदाजी

ख्रिस वोक्स 3-0-18-2, अवेश खान 4-0-23-2, रविचंद्रन अश्विन 4-0-47-1, टॉम करण 4-0-40-1, अमित मिश्रा 3-0-27-0, मार्कस स्टोईनिस 2-0-26-0.

दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. अली, गो. ब्रेव्हो 72 (38 चेंडूत 9 चौकार, 3 षटकार), शिखर धवन पायचीत गो. ठाकुर 85 (54 चेंडूत 10 चौकार, 2 षटकार), रिषभ पंत नाबाद 15 (12 चेंडूत 2 चौकार), मार्कस स्टोईनिस झे. करण, गो. ठाकुर 14 (9 चेंडूत 3 चौकार), शिमरॉन हेतमेयर नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 4. एकूण 18.4 षटकात 3 बाद 190.

गडी बाद होण्याचा क्रम

1-138 (शॉ, 13.3), 2-167 (धवन, 16.3), 3-186 (स्टोईनिस, 18.3).

गोलंदाजी

दीपक चहर 4-0-36-0, सॅम करण 2-0-24-0, शार्दुल ठाकुर 3.4-0-53-2, रविंद्र जडेजा 2-0-16-0, मोईन अली 3-0-33-0, डेव्हॉन ब्रेव्हो 4-0-28-1.

Related Stories

कोरोनावरील उपचारासाठी ‘रेमडेसिवीर’ची शिफारस करता येणार नाही : WHO

datta jadhav

ड्रीम 11 चा पुढील 2 वर्षांचा प्रस्ताव फेटाळला

Patil_p

हिटमॅन ऑस्ट्रेलियात सुपरहिट ठरेल

Patil_p

सायकलवरुन प्रवास करणाऱया ज्योतीचे इव्हान्काकडून कौतुक

Patil_p

धक्कादायक : कुलर सुरू करण्यासाठी व्हेंटिलेटरचा प्लग काढल्याने रुग्णांचा मृत्यू

pradnya p

आजपासून आयपीएलची ‘लस’

Amit Kulkarni
error: Content is protected !!