तरुण भारत

उदयनराजे उवाच

प्रतिनिधी/ सातारा

खासदार उदयनराजेंनी आज हटके आंदोलन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लावलेल्या लॉकडाऊनच्या निषेधार्थ केले. त्यांनी बोलताना प्रशासनासह राज्य शासनावर चांगलेच शेलक्या शब्दात ताशेरे ओढले.

Advertisements

काय नाय बसलोय आता…माझ्यावर ही परिस्थिती आली असेल तर गोरगरीबांचे ज्यांचे तळहातावर पोट आहे..त्यांची काय अवस्था असेल हे तुम्ही जाणून घ्याना…

कसं हाय एक लक्षात घ्या…ताकद आहे सगळं आहे…प्रश्न इच्छाशक्तीचा आहे…या सरकारमध्ये इच्छाशक्तीच नसलं तर आपण काय करणार…काय करु शकतो मला सांगा….लोकशाही आहे राजेशाही असती तर आतापर्यत कोणाला एवढे हालपण करु दिले नसते…

ढिगाने पैसे खातात..लसीकरण मिळत नाही. जे लसीकरण मिळाले आहे. ते आता कोरोना पॉझिटीव्ह झालेत… बाजार मांडलाय काय ह्या बाजारबुणग्यांनी… हा वाझे कोण आहे मला तेच कळत नाही…तुम्ही विचार करा ना ह्याला येवढे पैसे त्याला एवढे पैसे…खावा..पूर्वीचा साचा असतो नाक चकलीचा..किती खायचं गोरगरीबांचे काय नुकसान करायचे…

लॉकडाऊन म्हणजे काय लॉकडाऊन…तुम्ही सिमेंटच्या जंगलात राहता. हे बाकीचे लोक झोपडीत. लॉकडाऊन केला अधिकार दिला कोणी…काय अधिकार दिला…अक्कलेचा भाग आहे काय?…

एक तरी मेडिकल सायन्सचा स्टुडंट आहे… आजपर्यत याच्यावर सायंटींस्ट लोकांनी याच्यावर वक्तव्य केलं नाही… इट इज डय़ुटी सायंटीस्ट…मेडिकल फॅटर्निटी गेली खड्डय़ात…इट इज ओन्ली सायंटीस्ट..

लॉकडाऊन करा लॉकडाऊन करा…तुमचे काळे कारनामे लपवण्याकरता लॉकडाऊन… कशाकरता.. जे पत्र्याच्या शेडमध्ये राहतात त्यांची अवस्था काय आहे… हे त्यांना पोलीस लोक येवून देत नाही.. उन्हाळा येवढा वाढलाय.. मरतील तेथे… नाय बसलं की दांडक घालतात. यांना अधिकार दिला कोणी…

 सगळया पोलिसांनी एक लक्षात ठेवल पाहिजे… एसपीपासून आयजीबीजी सगळे ऑल पोलीस की आज तुमच्या आमच्यासारखे टॅक्स भरतात म्हणून तुमचे पगार होतात. दॅट गव्हमेंट सर्व्हंट बिहेव्ह…कलेक्टर…जो हेतू तो जातो…काय न करता लॉकडाऊन तुमच्या बापाची इस्टेट आहे व्हय….काय गरज आहे…जगाची रित आहे.. एकच सत्य आहे. तुम्ही कसं वागता…परतफेड करावी लागणार…

जो येतो त्याला एक ना एक दिवस जावेच लागते… तब्येत व्यवस्थीत ठेवली.. इम्युनिटी ठेवली…तुम्ही काहीच पाळल नाही तर तुम्हाला होणार…सातारा शहरातल बघायचे झाले तर ज्यांचे मृत्यू झाले त्याला सरकार जबाबदार आहे..एकतर व्हॅक्सीन तुम्ही पुरवू शकत नाही…वरन पैसे खाता…एका पोलीस अधिकाऱयांच्या एवढे तर बाकीच्यांचे किती मला माहिती नाही.

लोकांनी विचार केला पाहिजे ना. माझी एकटय़ाची असती तर सगळय़ांना हत्तीच्या पायाखाली तुडवलं असत. एक मेला तरी चालेल पण लाख जपले पाहिजेत…ह्यांना मी जगलं पाहिजे लाख मेले तरी चालतील अशी परिस्थिती आहे.. तेंडावर ह्यांनी कधीपण सांगाव समोरासमोर…तुमच्याकडे व्हॅक्सीन अवेलेबल नाही…राज्य शासनाने निर्णय घ्यावा ना… पैसे रिलीज करा अन् व्हॅक्सीन घ्या ना. पैसे नसतील तर सांगा आम्हाला.. भ्रष्टाचार केला नसता तर लगच्या लगेच आळा घातला असता आता पगार नाही पोलिसांचा…उद्या हे सुद्दा कसे कामाला येतील… कुठून आणणार पैसे वरन टॅक्स वाढवताय तुम्ही…

ह्या पार्श्वभूमीवर तुम्हाला दिला कुणी अधिकार. दुकानदारांना आरटीपिसीआर दर पंधरा दिवसाला करायला लागते. मी व्यापाऱयांच्या बाजूने बोलत नाही. सर्वसामान्यांच्या बाजूने बोलतोय..व्यापार बंद सगळं बंद आणी हे सगळी शहाणी….कलेक्टर आणि जिल्हा प्रशासन लय शहाण आहे…बुद्धी त्या लोकांना दिली आहे काय ते फक्त मंत्रीमंडळात आहेत त्यांना..उदयनराजेंना बुद्धी आहे ना हो मला बुद्दी आहे…माझ्या ताब्यात द्या सगळं मी नियोजन करतो.. सगळ बंद करुन टाकल उपासमारीची वेळ आली. कशाकरता ह्यांच्या बापाची इस्टेट आहे व्हय सगळय़ांच्या.. काढा संगळय़ांचे आतापर्यंत कोणी किती खालय..

एव्हरीवन आज त्यांच्यामुळे लोकांची परिस्थिती आली आहे. .मला विचारायचे गरज नाही पोलीस प्रशासन सांगेल. आमच नाव सांगू नका आमची बदली होईल. परखडपणे बोलतो का माझा जीव तुटतो. याद राखा पोलिसांनी काठी मारली कोणाला. देवाशपथ सांगतो लॉ ऍण्ड ऑडर निर्माण होईल. इथ नाही महाराष्ट्रात. सरळ सांगतो कोणाला घाबरुन् नका. पोलीस डिपार्टमेंटचा आपण आदर करतो…याचा असा अर्थ नाही की त्यांनी कायपण करावे. त्यांची ताकद काही नाही झिरो आहे झिरो.. मानला तर देव नाहीतर दगड..लोकसंख्या किती आहे आवरु शकणार. हजार लोकांनी एका पोलिसाला धरल अन् चोपल तर हाड तरी दिसतील का तस काय करु नका. मी तर सोडणार नाही.

Related Stories

सातारा जिल्ह्यात मृत्यूचे तांडव; 41 जणांचा मृत्यू

datta jadhav

कारागृहातील संशयिताकडून पिस्टल घेतले

Amit Kulkarni

सायकलवरून भारत भ्रमंती करणारा सातारचा अवलिया

Shankar_P

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच जिल्हा दौऱयावर

Omkar B

सोलापूर : जमत असेल तर काम करा, अन्यथा सोडून द्या – जिल्हा आरोग्य अधिकारी

Shankar_P

खानापूर तालुक्यातील 65 गावांचा सर्व्हे पूर्ण

triratna
error: Content is protected !!