तरुण भारत

विकेंड लॉकडाऊनमध्ये शहरात सन्नाटा

प्रतिनिधी/ सातारा

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी घेतला आढावा

Advertisements

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्वतः निवासस्थानावरुन येतानाच वाहनातूनच परिस्थितीची माहिती घेतली. जिह्यात नेमकी परिस्थिती काय आहे, सातारा शहरात काय परिस्थिती आहे याची माहिती घेतली. त्यामध्ये त्यांनी पोवई नाका येथे थांबून तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱयांना सुचना दिल्या. तसेच स्वतःही नेमकी काय अवस्था आहे. जाताजाता त्यांनी शहराची माहिती घेतली.

राजवाडा आणि मंगळवार तळे रोडवर फळांचे गाडे

सगळीकडे शुकशुकाट दिसत असताना पोलीस दलाचे कर्मचारीही बंदोबस्ताला होते. परंतु राजवाडा येथील प्रतापसिंह हायस्कूलच्या बाहेर फळांचे गाडे लावलेले दिसत होते. तसेच विठोबाच्या नळाच्या ठिकाणी फळाचे दोन गाडे लागले होते. त्यांना विचारले असता फळाच्या विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनीही त्यांच्याकडे कानाडोळा केला. देवी चौकात केळाच्या गाडय़ावर गर्दी दिसत होती.

वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांची भिरकीट

सातारा शहरात मिनी लॉकडाऊनमध्ये अनावश्यक कोणी बाहेर पडते काय त्यांना सुचना देण्यासाठी वाहतूक शखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी शहरातून भिरकीट लावली होती. त्यांनी मोती चौक, राजवाडा, मंगळवार तळे रोड, खालचा रस्ता, वरचा रस्ता यावर फिरुन माहिती घेत होते.

एसटीची चाके थांबली

सातारा आगारातून दररोज 350 फेऱया होत असतात. आज सकाळी मुक्कामाहून आलेल्या गाडय़ा सातारा आगारातच थांबल्या. तेथून पुन्हा बाहेर पडल्या नाहीत. जवळचे कर्मचारी फक्त आगारात आले होते. सर्व बसेस प्रवाशीच नसल्याने आगारातच उभ्या होत्या. स्वतः आगारप्रमुख रेश्मा गाडेकर याही निवासस्थानापासून आगारापर्यंत पायी चालत आल्या.

लसीकरणाला जिल्हा रुग्णालयात गर्दी

सातारा जिह्यात काल रात्री 35 हजार कोरोनाच्या लसी आल्या. त्या जिह्यातील 400 उपकेंद्र, 71 प्राथमिक आरोग्य केंद्र, 11 ग्रामीण रुग्णालयांमध्ये पोहचवण्याचे काम सकाळीच सुरु होते. क्रांतीसिंह नाना पाटील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती. दरम्यान, ही लस दुपारपर्यंतच संपणार असल्याने गर्दी दिसत होती.

Related Stories

सातारा जिल्ह्यात 290 नागरिकांना दिला डिस्चार्ज, 892 नमुने पाठविले तपासणीला

triratna

दुसऱया दिवशीही खरेदीसाठी उसळली गर्दी

Patil_p

सदरबझारमध्ये भरदिवसा घरफोडी

Patil_p

वाकेश्वर- भुरकवडीत हवाई सर्वेक्षण : ड्रोनच्या सहाय्याने पथदर्शी प्रयोग

triratna

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत नवी मुंबई महापालिका संघास विजेतेपद

Patil_p

सातारा झेडपीचा कोरोना कक्ष केबीपी कॉलेजमध्ये हलवला

Shankar_P
error: Content is protected !!