तरुण भारत

गृह विलगीकरणातून गुरुजींचे पलायन?

  वार्ताहर    /     राजापूर  

राजापूर तालुक्यातील केळवली येथे घरी विलगीकरणात असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाने घरातून पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा रूग्ण शिक्षक असून त्याने थेट आपले मूळ गाव कुडाळ गाठल्याचे बोलले जात आहे.  

Advertisements

गुरूवारपर्यंत तालुक्यातील ऍक्टीव्ह रुग्णांचा आकडा 58 झाला होता. तालुक्यात कोविड केअर सेंटर नसल्याने सौम्य लक्षणे असणाऱया रुग्णांचे घरातच विलगीकरण करण्यात येत असून काही रुग्णांना रत्नागिरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये पाठवण्यात येत आहे. गुरूवारी केळवली येथील प्राथमिक शाळेवर नियुक्ती असलेल्या एका शिक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य विभागाने त्यांचे स्वतंत्र खोलीत विलगीकरण केले. दुसऱया दिवशी आरोग्य विभागाचे कर्मचारी चौकशी करण्यासाठी गेले असता रुग्ण घरात नसल्याचे निदर्शनास आले. संबंधित शिक्षक हे मुळचे कुडाळ येथील असून ते गुरूवारी सायंकाळी कुडाळ येथील आपल्या घरी निघून गेल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोनाबाधित असतानाही शिक्षकाने राजापुरातून पळ काढल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित शिक्षकाने मुलाच्या दुचाकीवरून राजापूर ते कुडाळ प्रवास केल्याची माहितीही पुढे आली आहे. दरम्यान आरोग्य विभागाने कुडाळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून या बाबत माहिती दिली. कोरोनाबाधित असताना विलगीकरणातून पळ काढल्याने संबंधित शिक्षकावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

आरटीओ कार्यालय एजंट्सच्या हवाली?

Patil_p

लाचप्रकरणी तत्कालीन भरणे ग्रामसेवकाचे निलंबन

Patil_p

रत्नागिरी : राजापूर शहरात धाडसी दरोडा ,लाखोंचा ऐवज लंपास

Shankar_P

दुग्धजन्य पदार्थांना ‘एक्सपायरी डेट’ बंधनकारक

NIKHIL_N

कोरोनामुळे राजापूर नगर परिषदेच्या 15 कोटींच्या कामांना खीळ

Patil_p

‘सेव्हन हिल’मध्ये बजावली सलग 45 दिवस रुग्णसेवा

NIKHIL_N
error: Content is protected !!