तरुण भारत

भाजपच्या पराभवासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावे

‘एक पावल एकचारा’ची पत्रकार परिषद

प्रतिनिधी/ मडगाव

Advertisements

पालिका निवडणुकीत कोणत्याही अन्य राजकीय पक्षाकडे युती न करताना काँग्रेस पक्षाने स्वताहून निवडणूक लढविणे आवश्यक होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे देखील तेच मत असताना मडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी गोवा फॉरवर्डशी युती करून काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न चालविला असल्याची घणाघातकी टीका ट्रॉजन डिमेलो यांनी केली.

फातोर्डा मतदारसंघातून काँग्रेस पक्षा तर्फे मडगाव नगरपालिकेसाठी एकूण सहा उमेदवार उभे केले असून त्यासंदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ट्रॉजन डिमेलो प्रसार माध्यमांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेला फातोर्डा काँग्रेस पॅनलचे प्रमुख डॉ. आशिष कामत, माजी नगराध्यक्ष पियेदाद नोरोन्हा तसेच पॅनलचे उमेदवार उपस्थितीत होते.

आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचे भाजपकडे सेटिंग आहे. त्यामुळेच सचिवालयात त्यांना कॅबिन मिळाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळणे कठीण आहे. जर ते खरेच काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक असते तर त्यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत आपले योगदान दिले असते. तसेच आत्ता मडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कुडतरी मतदारसंघातील दोन प्रभागातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे केले असते. मात्र, त्यांनी हे दोन्ही प्रभाग गोवा फॉरवर्डला दिल्याने, त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल संशय घेण्यास वाव असल्याचे श्री. डिमेलो म्हणाले.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हे दहा आमदारांसोबत भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यांना तशी संधी मिळाली नाही. परंतु, भविष्यात ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. त्यांनी गोवा फॉरवर्डकडे युती करताना काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कल्पना दिलेली नाही. त्यांनी परस्पर निर्णय घेतलेला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याची दखल घेतलेली आहे. फातोर्डा मतदारसंघातून काँग्रेस पक्ष संपविण्यासाठी दिगंबर कामत हे पुढाकार घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. फातोर्डा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ला होता. आजही या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते असून त्यांना काँग्रेस पक्ष मजबूत झालेला हवा आहे. त्यामुळेच आज पालिका निवडणुकीत पक्षा तर्फे सहा उमेदवार उभे करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

फातोडर्य़ात येणार पैशांचा महापूर…

फातोर्डा मतदारसंघात पालिकेच्या निवडणुकीसाठी पैशांचा महापूर येणार असून सत्तेवरील भाजपला याची कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी आत्ताच या मतदारसंघाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. या ठिकाणी ईडी तसेच अन्य सरकारी यंत्रणांना सतर्क केले पाहिजे असे ट्रॉजन डिमेलो म्हणाले.

विजय सरदेसाई आजही एनडीएचे घटक

विजय सरदेसाई यांनी काँग्रेसची मते प्राप्त करून फातोडर्य़ातून विजयी झाले. मात्र, त्यांनी मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला व भाजपचे सरकार सत्तेवर आणले. आज ते सरकारला दोष देत आहेत. तो केवळ मतदारांची दिशाभूल करण्यासाठीच. आज देखील ते एनडीएचे घटक आहेत. त्यांनी भाजप सरकार स्थापन करताना भाजपला दिलेला पाठिंबा मागे घेतलेला नाही. तो का मागे घेतला जात नाही, याचे स्पष्टीकरण त्यांनी जनतेला देणे आवश्यक आहे असे डॉ. आशिष कामत म्हणाले.

काँग्रेस पक्ष मडगाव पालिकेची निवडणूक लढविणार हे पालिका निवडणुका घोषित झाल्यानंतर त्वरित स्पष्ट करण्यात आले होते. तरी सुद्धा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी गोवा फॉरवर्डकडे युती केली. त्यानंतर फातोर्डातून काँग्रेस निवडणूक लढवू शकणार नसल्याचे सांगण्यात आले. आपल्याबरोबर बैठक घेतली. मात्र, त्या बैठकीत आपण, विजय सरदेसाई हे एनडीएचे घटक असून त्यांच्याशी कशी युती केली जाते असा सवाल उपस्थितीत केला होता. जर विजय एनडीएतून बाहेर पडत असेल तर विचार करून माघार घेणे शक्य होते. परंतु, आज पर्यंत ते एनडीएतून बाहेर पडले नसल्याने त्यांच्याशी काँग्रेस पक्ष युती करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे आपण विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना सांगितले होते असे डॉ. आशिष कामत म्हणाले.

दरम्यान, फातोर्डा मतदारसंघातून काँग्रेस पक्षा तर्फे सहा उमेदवार उभे करण्यात आले आहेत ते पुढील प्रमाणे, प्रभाग ः 3 ः फातिमा बार्रेटो, प्रभाग ः 4 ः जेस्सी सांन्ड्रा वाझ, प्रभाग ः 6 ः योगेश अरविंद नागवेकर, प्रभाग ः 9 ः रोशल फर्नांडिस, प्रभाग ः 10 ः रजत लुमा कामत व प्रभाग ः 11 ः अन्वर बाबुलाल सय्यद. अन्य काही प्रभागात अपक्ष उमेदवारांना काँग्रेस पक्षातर्फे पाठिंबा दिला जात असल्याची माहिती पियेदाद नोरोन्हा यांनी दिली.

Related Stories

साखळीत वादळी वाऱयासह दमदार पाऊस.

Omkar B

पोर्तुगीज अधिकारी मोर बाबूशच्या मुलाचे काणकोणात निधन

Patil_p

जीएसके हिंदुस्थान युनिलिव्हरचा हिस्सा विकणार

Patil_p

इस्रायलच्या गाझा शहरात 24 तासात दुसऱयांदा रॉकेट हल्ला

Patil_p

बेळगाव जिल्हय़ात शुक्रवारी 156 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Patil_p

बेळगावात कोरोनाचा पहिला बळी

Patil_p
error: Content is protected !!