तरुण भारत

म्हापसा पालिकेसाठी अखेर उमेदवार रिंगणात

प्रतिनिधी/ म्हापसा

म्हापसा नगर पालिकेच्या 20 वॉर्डासाठी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकूण 14 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अखेर आता 81 उमेदवार रिंगणात राहीले आहे. विशेष म्हणजे माजी नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो यांचा वॉर्ड क्रमांक 7 ओबीसीसाठी राखीव झाल्याने त्यांनी आपण खारवी समाजाचा बांधव असल्याचे कारण पुढे करून खारवी समाजासाठी अर्ज केला. मात्र याच वॉर्डचे विरोधक उमेदवार तारक आरोलकर यांनी फ्रँकीनी बोगस दाखला पत्र मिळविण्याचे कारण पुढे करून त्यांनी त्या विरोधात उपजिल्हाधिकारी कपिल फडते यांच्याकडे अर्ज केला असता फ्रँकी यांचा खारवी समाजाचा अर्ज फेटाळून लावल्याने कार्व्हालो यांना ही निवडणूक लढविता आली नाही.

Advertisements

याच वॉर्डातील एक उमेदवार संतोष कोरगांवकर यांनी तारक आरोलकर यांच्या जन्म दाखल्यासंबंधी हरकत घेतली असता उपजिल्हाधिकारी मामू हेगे यांनी आपण केवळ उमेदवार निवडणुकीस पात्र आहे की नाही हेच पाहू शकते असे कारण पुढे करून तारक आरोलकर यांचा अर्ज ग्राह्य धरला. त्यामुळे फ्रँकी आऊट आणि तारक इन असा प्रकार म्हापशात घडला असून येथे राजकीय समिकरणे बदललेली आहे. एकूण 95 अर्ज वैध ठरले आहे. समृद्धी वायंगणकर ही मुलगी अल्पवयीन असल्याने तिचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

इच्छुक उमेदवार

वॉर्ड क्र. 1- आनंद पुंडलिक भाईडकर, रामा जयदेव कशालकर, भूषण तुकाराम मयेकर, वैभव वासुदेव पराष्टेकर, वॉर्ड क्र. 2- संजना संजय बाणावलीकर, चंद्रशेखर चंद्रकांत बेनकर, अल्पा आनंद भाईडकर, मंगेश गजानन हरमलकर, जेम्स सावियो सोजा, प्रभाकर बाळकृष्ण वेर्णेकर, वॉर्ड क्र. 3- बारबरा मार्टीन कारास्को, लॉरेन डॉर्टी कारास्को, नलीशा नताशा कारास्को, वॉर्ड क्र. 4- मायकल जॉन कारास्को, सुशांत रामनाथ हरमलकर, संगीता सुहास कोरगांवकर, वॉर्ड क्र. 5- प्रवीण चंद्रकांत आसोलकर, संदीप वसंत गडेकर, नीशा नागेश मयेकर, शशांक सुभाष नार्वेकर, किशोर शाबा राऊत. वॉर्ड क्रमांक 6- नूतन दत्ताराम बिचोलकर, ज्योत्सना महेश काळोजी, वृशाली सुभाष मांद्रेकर, वीरा वामन पंडित. वॉर्ड क्र. 7- तारक मंगेश आरोलकर, गोविंद गजानन गडेकर, संतोष सखाराम कोरगावकर. वॉर्ड क्र. 8- विकास मंगेश आरोलकर, मर्लीन ऑस्कर डिसोझा, जॉन युरी लोबा, ज्ञानेश्वर बुधू वायंगणकर. वॉर्ड क्र. 9-केल मॅथ्यू ब्रागांझा, शीतल अच्युत वेर्णेकर. वॉर्ड क्र. 10-सिद्धेश मधुकर कोरगांवकर, प्रिया वल्लभ मिशाळ, भारती भारत पार्सेकर. वॉर्ड क्र. 11-संगीता घनश्याम आर्लेकर, अंकिता सुदेश हसोटीकर, किशोरी किशोर कोरगांवकर, रितिका राजेश वाडकर. वॉर्ड क्र. 12- पृथ्वीराज लक्ष्मण आमोणकर, समीर रामदास हरमलकर,  आशीर्वाद तुकाराम खोर्जुवेकर, उज्ज्वला गुरुदास नाईक, रोहीत मच्छिंद्रनाथ वळवईकर. वॉर्ड क्र. 13- कमल जोजफ डिसोझा, श्रीया निशिकांत साळगावकर. वॉर्ड क्र. 14- गोस्पीर शफी बेंकेपूर, सुभाष पंढरीनाथ भोबे, केदार उमेश कामत, साईनाथ गोपाल राऊळ, सिकंदर चंद्रसाब स्वार, वासिम चंद शेख, यशवंत तुकाराम शेटय़े, महेश गोविंद शिरगावकर. वॉर्ड क्र. 15- आंतिनियो लुईस आल्वारीस, मनिता मनोहर गडेकर, विजेता अभिजीत नाईक, स्वप्निल विलास शिरोडकर. वॉर्ड क्र. 16- शुभम दयानंद पार्सेकर, विराज फडके, विनोद, सुहास मनोहर साखळकर, विश्वास गजानन साळगावकर, शुभम भारत तोरस्कर. वॉर्ड क्र. 17- पूनम शैलेश आजगावकर, वैशाली संजय बर्डे, सिचिता सुनील गोवेकर, शुभांगी गुरुदास वायंगणकर. वॉर्ड क्र. 18- मनिशा रोहन कवळेकर, अन्वी अमय कोरगावकर, रेश्मा रमेश मठकर, साक्षी दिनेश नानोडकर, उज्ज्वला धनंजय शेटय़े, उर्मिला निशिकांत येंडे. वॉर्ड क्र. 19- रेणुका गुरुदत्त भक्ता, सुधीर रामा कांदोळकर. वॉर्ड क्र. 20- प्रकाश वसंत भीवशेट, यान्सी सेबस्टियन डिसोझा, फिरोज आयुब खान, दीपक सखाराम म्हाडेश्री.

अर्ज मागे घेतलेले उमेदवार

वॉर्ड क्र. 2- सावियो मॅथ्यू आझावेदो, संजय पोपट बाणावलीकर, चेतना चंद्रशेखर बेनकर, जीमी क्रिष्णा चोडणकर, जोविला वेलंकनी पिंटो. वॉर्ड क्र. 7- उन्नती उदय आरोलकर, उद्देश वसंत आरोलकर, सिद्धार्थ चंद्रकांत मयेकर, नरेश रघुवीर वेरेकर. वॉर्ड क्र. 8- प्रिती विकास आरोलकर. वॉर्ड क्र. 10- निलेश तुळशीदास घाटवळ. वॉर्ड क्र. 12- राजेश प्रभाकर हिरवे. वॉर्ड क्र. 15-अभिजीत एकनाथ नाईक. वॉर्ड क्र. 20- अक्षय प्रकाश भीवशेट.

वॉर्ड क्रमांक 9 मध्ये केल ब्रागांझा व शितल अच्युत वेर्णेकर, वॉर्ड क्र. 13 मध्ये कमल जोसेफ डिसोझा व श्रीया निशिकांत साळगावकर या दोन वॉर्डमध्ये थेट निवडणूक होणार आहे. वॉर्ड 14 मध्ये सर्वाधिक 8 उमेदवार रिंगणात आहेत.

Related Stories

‘आयआयटी’साठी सरकारने सालाझारशाही बंद करावी

Patil_p

कोरोना ‘बायोसेफ्टी मशिन’ बनले शोभेची वस्तू

Omkar B

रविवारी दक्षिण गोव्यात खंडित वीज पुरवठा

Amit Kulkarni

सत्ता हाती आल्यास सहा महिन्यात डिचोलीचा चेहरामोहरा बदलू

Amit Kulkarni

च्यारी समाज बांधवांनी घराघरात केली रामनवमी साजरी !

Patil_p

पद्मभूषण लक्ष्मण पै यांचे निधन

Amit Kulkarni
error: Content is protected !!