तरुण भारत

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 62 लाख 55 हजार रुपये जप्त

44 लाख 26 हजार रुपयांचे मद्य-वाहनेही जप्त, निवडणूक अधिकाऱयांची माहिती

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी चेकपोस्ट स्थापन करण्यात आले आहेत. त्या चेकपोस्टच्या ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत विविध ठिकाणी 62 लाख 55 हजार 510 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर 11 लाख 25 हजार रुपयांचे मद्य आणि वाहने असा एकूण 42 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉ. हरिषकुमार यांनी दिली आहे.

लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 27 चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी येणाऱया वाहनांवर नजर ठेवून वाहनांची तपासणी करून बेकायदेशीर रक्कम जप्त करण्यात आली आहे. एकूण 62 लाख रुपयांपैकी 19 लाख 83 हजार 890 रुपये ज्या व्यक्तींनी योग्यप्रकारे पैशांसंदर्भातील अहवाल दिला आहे, त्यांना ती रक्कम परत देण्यात आली आहे. तर 42 लाख 71 हजार 620 रुपयांच्या रकमेबाबत वरि÷ विभागाकडे चौकशी करण्यासाठी पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अबकारी आणि पोलीस विभागाने 11 लाख 25 हजार रुपये किमतीचे 4 हजार 20 लिटर मद्य, एक कंटेनर, एक टँकर, चार कार, एक जीप असा एकूण 42 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चेकपोस्टवर सर्व वाहनांची तपासणी करून सदर कारवाई अबकारी व पोलिसांनी संयुक्तपणे केली आहे.

बेकायदेशीर दारू विक्री करणारे तसेच इतर बेकायदेशीर कामे करणाऱया 128 जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कोविड-19 चे नियम न पाळणाऱया 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रचार करताना, सभा घेताना, कोविडचे नियम पाळले नाहीत अशा तीन घटना प्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याचबरोबर 16 जणांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आतापर्यंत एकूण 56 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सभा, प्रचार यांच्यावर करडी नजर ठेवण्यात आली असून जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.  

Related Stories

व्हीटीयू सुरू करणार तीन नवीन अभ्यासक्रम

Patil_p

कुडचडेतील ‘मनिग्राम’ कार्यालयात पुन्हा चोरी

Patil_p

माजी आमदार बी. आय. पाटील यांचा अहवाल निगेटिव्ह

Patil_p

म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या खटल्याची

Patil_p

राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कॅम्पस हिरेबागेवाडीजवळ उभारणार

Patil_p

हायटेकबरोबरच हायस्पीड वेश्याव्यवसाय

Amit Kulkarni
error: Content is protected !!