तरुण भारत

कार, गुडस् वाहने चोरण्याच्या घटनेत वाढ

दुचाकी पाठोपाठ मोठी वाहनेही चोरटय़ांचे लक्ष्य

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

बेळगाव शहर व उपनगरांत वाहने चोरीचे प्रकार वाढले आहेत. दुचाकींपाठोपाठ मोठी वाहनेही लक्ष्य बनविण्यात येत असून त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. रस्त्या शेजारी व घरासमोर उभी करण्यात आलेली वाहने चोरटय़ांचे लक्ष्य बनत आहेत.

दोन दिवसांपूर्वी कडोली येथील एक दुचाकी चोरीची घटना घडली आहे. या पाठोपाठ माळमारुती व टिळकवाडी पोलीस स्थानकात कार व गुडस् वाहने चोरीच्या घटना नोंद झाल्या आहेत. खास करुन शहर व उपनगरांत दुचाकी चोरीचे प्रकार वाढले असून चोरटय़ांच्या मुसक्मया आवळण्याची गरज निर्माण झाली आहे.

कटकोळ (ता. रामदुर्ग) येथील श्रीकांत गोरवर यांनी आपल्या मालकीची अशोक दोस्त हे गुडस् वाहन अमाननगर येथील एका चालकाला चालवायला दिले होते. 25 मार्च रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास या वाहन चालकाने आपल्या घरासमोर हे वाहन उभे केले होते. दुसऱया दिवशी सकाळी या वाहनाची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

तर सुखकर्ता कॉलनी, भाग्यनगर नववा क्रॉस येथील राहुल दत्तात्रय हलगेकर यांच्या मालकीची आय-20 ही कार चोरीस गेली असून 26 फेब्रुवारी रोजी हा प्रकार उघडकीस आला आहे. सर्वत्र शोध घेऊन राहुल यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस चोरीच्या वाहनांचा शोध घेत आहेत.

Related Stories

मनपा कार्यालयातील कर्मचाऱयांच्या कामकाजात बदल

Patil_p

जे सुंदर ते अधिक सुंदर करण्याची किमया चित्रकार करतो

Rohan_P

फेसबुक प्रेंड्स सर्कलने रुग्णासाठी केले रक्त उपलब्ध

Amit Kulkarni

राज्य परिवहन मंडळाच्या बसने ठोकरल्याने मोटार सायकलस्वार जागीच ठार

Patil_p

प्रेंड्स सर्कलतर्फे सुनीता देशपांडे-बुद्धय़ाळकर यांना श्रद्धांजली

Patil_p

बेकिनकेरेत 37 पैकी 7 उमेदवारांची माघार

Patil_p
error: Content is protected !!