तरुण भारत

समाजात सकारात्मकता रुजविणे ही प्रत्येकाची जबाबदारी

प्रतिनिधी/ बेळगाव

स्वातंत्र्यलढय़ापासून आजतागायत स्त्राrने सर्वक्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले. परंतु मी सर्व काही करू शकते, हे सिद्ध करण्याच्या धडपडीमध्ये तीने स्वतःच काही जबाबदाऱया वाढवून घेतल्या आहेत. त्यामुळे तिचा ताण वाढला. कुटुंबातील तिची स्पेस कमी झाली आणि नवीन समस्या उद्भवल्या. त्यातून स्त्रियांनीच बाहेर पडायला हवे आणि कौटुंबिक व सामाजिक समतोल साधायला हवा, असे विचार लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले.

Advertisements

शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे राज्य मराठी विकास परिषदेच्या अनुदानाद्वारे ‘सखी संवाद’ कार्यक्रमांतर्गत सुमित्रा महाजन यांनी झूमद्वारे महिलांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. आपल्या एकूण कारकिर्दीचा प्रवास त्यांनी यावेळी उलगडला.

त्या म्हणाल्या, स्त्रियांनी अनेक जबाबदाऱया वाढवून घेतल्याने कुटुंबातील त्यांचे शेअरींग कमी झाले. त्याचा परिणाम स्त्राr-पुरुष नातेसंबंधावरही झाला. परंतु परिस्थिती घाबरण्यासारखी नाही. कारण स्त्रिया या ताणातून बाहेर पडतील आणि पुन्हा सर्व घडी नीट बसवतील याचा मला विश्वास आहे.

चंगळवाद सर्व क्षेत्रात असून त्यावर काही उपाय होऊ शकेल का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, जागतिकीकरणाने काही समस्या निर्माण झाल्या. भारतीय संस्कृती आक्रमण करणारी नसून संक्रमण करणारी आहे. मात्र अलिकडे ‘मी, तू आणि समाज’ हे बीज पेरण्यास आपण कमी पडतोय. ज्या समाजाचा मी घटक आहे, त्या समाजाचा विचार मी केला पाहिजे ही भावना प्रबळ व्हायला हवी. आपली कुटुंब व्यवस्था, संस्कार प्रबळ करावे लागतील. आपले तत्त्वज्ञान चंगळवादाकडे नेणारे नाही. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. फक्त माझ्यासह तुझा आणि समाजाचा विचार करणारी आपली संस्कृती आहे, हे सतत ठसवायला हवे.

स्वातंत्र्याच्या शताब्दीला स्त्राr, कुटुंब आणि समाज कसा असेल? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, कुटुंब व्यवस्था असेल, पद्धती बदलतील. ‘थिंक ग्लोबल ऍट लोकल, रिस्पॉन्स पर्सनल’ असे दत्तोपंत थेंगडी म्हणायचे. तेच आचरणात आणावे लागेल. देशाचा आणि वैश्विक विचार करावा लागेल. माझ्या राष्ट्राला महत्त्व हवे, हा विचार पेरावा लागेल व परदेशात गेलेल्या तरुणांनी भारतात परत येण्यासाठी वातावरण निर्माण करावे लागेल. कारण समाजात सकारात्मकता आणणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

राजकारणातील अनुभवाबद्दल त्या म्हणाल्या, बरे-वाईट अनुभव प्रत्येक व्यक्तीला येतातच. परंतु आपल्या दिसण्यापेक्षा आपले असणे महत्त्वाचे आहे. आपल्या कर्तृत्वाचे तेज डोळय़ात चमकले पाहिजे आणि आपल्या कामाचा वचक ठेवावाच लागेल. मी हेच सूत्र अवलंबत आले आहे. प्रत्येक समस्येवर ‘थाईट आऊट’ करावेच लागते.

यानंतर महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना, मी राजकारणात नसते तर प्रवचनकार झाले असते, असे त्या म्हणाल्या. महिला मंडळांनी सांस्कृतिक काम करतानाच समाजासाठीही काम करायला हवे. साहित्याकडेही त्यांनी वळायला हवे. अनुभव घेऊन अभ्यासपूर्ण लेखन व्हायला हवे. माझा जन्म चिपळूणचा आहे. पण लग्नानंतर इंदूरला आले. तेथील सामाजिक जीवन खूप चांगले आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी माधवी बापट यांनी स्वागत केले. स्वाती फडके व शीतल गोगले यांनी देवी प्रार्थना सादर केली. डॉ. संजीवनी खंडागळे यांनी त्यांचा परिचय करून दिला. माजी अध्यक्षा कुंदा बेळगावकर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. मेधा देशपांडे यांनी आभार मानले.

Related Stories

दुसऱया टप्प्यातील निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

Omkar B

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मंगाई देवी यात्रा रद्द

Rohan_P

कुडलसंगम पूजावनात चंदन झाडांची चोरी

Patil_p

सरकारी कार्यालयासह बाजारपेठेत सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष

Patil_p

बेळगाव जिह्यात गुरुवारी 166 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

Rohan_P

मनपातील कर्मचाऱयांसाठी स्वतंत्र हॉस्पिटलची सोय करा

Patil_p
error: Content is protected !!