तरुण भारत

मोदींचा भ्रमनिरास होण्यासाठी काँग्रेसला साथ द्या

 नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे मतदारांना आवाहन

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

माझ्या नावावर देशातील कोणत्याही राज्यामध्ये उमेदवार निवडून येतात असा भ्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाला आहे. मात्र आता हा भ्रम बेळगावची जनता नाहीसा करणार असून जनतेने एक जुटीने काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करावे आणि बेळगावातूनच संपूर्ण देशातील सत्ता बदल सुरू करावे, असे आवाहन राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे वरि÷ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे.

बेळगाव पोटनिवडणुकीचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्या प्रचारासाठी मल्लिकार्जुन खर्गे बेळगावात आले आहेत. यावेळी त्यांनी भाजपने महागाई कशी केली आहे? याची माहिती दिली. शेतकऱयांच्या विरोधात जाचक कायदे काढले आहेत. ते कायदे रद्द करणे गरजेचे असताना शेतकऱयांची आणि गोर-गरीब जनतेची भाजपने दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

देशामध्ये तरुण मोठया संख्येने बेरोजगार होत आहेत. सार्वजनिक संस्थांचे खासगीकरण जोरात सुरू आहे. केवळ भाजपने हुकूमशाही सुरू केली आहे. प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे. तेंव्हा आता या सरकारला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत हिसका दाखविणे गरजेचे असून जनतेने एकत्र येवून सतीश जारकीहोळी यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Stories

10 हजारहून अधिक बसपास विद्यार्थ्यांच्या हातात

Amit Kulkarni

प्रत्येक विद्यार्थ्याने उच्च ध्येय ठेवले पाहिजे

Patil_p

खानापूर शहरात गुरुवारी सापडले 5 नवे कोरोनाबाधित

Patil_p

युवकांनी उच्च शिक्षणाची शिखरे सर करावीत

Patil_p

हलगा येथे सापडला 10 फुटी धामण साप

Amit Kulkarni

हिंदवाडी-शहरात सुरू होणार पोस्ट फ्रेंचायजी

Patil_p
error: Content is protected !!