तरुण भारत

निवडणुकीतून मराठी बाणा दाखवा

म.ए.समितीचे उमेदवार शुभम शेळके यांचे आवाहन

वार्ताहर / हलगा

Advertisements

मोडेन पण वाकणार नाही ही मराठय़ाची जात आहे, असा आपला इतिहास आहे. येत्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत स्वाभिमानी मराठी मतदारांनी पुन्हा म. ए. समितीला भरघोस मतदान करावे व आपला स्वाभिमानी बाणा दाखवावा. मराठी माणसांना आमिषे दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु हा प्रयत्न मराठी माणूस हाणून पाडील. गेल्या 65 वर्षांपासून संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी जो लढा चालला आहे, तो सीमाप्रश्न सोडविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू व सीमाप्रश्न सोडवू, असे प्रतिपादन मध्यवर्ती म. ए. समितीचे लोकसभा उमेदवार शुभम शेळके यांनी हलगा येथील सभेवेळी केले.

हलगा गावामध्ये शुभम शेळके यांचे आगमन होताच फटाक्मयांची आतषबाजी करण्यात आली. शिवनेरी चौक येथे शुभम शेळके यांना भगवा फेटा बांधल्यानंतर श्रीरामांचे पूजन करण्यात आले. यानंतर मरगाई गल्लीमधून प्रचारफेरीला सुरुवात झाली. यावेळी महिलांनी शुभम शेळके यांचे आरती ओवाळून स्वागत केले. शिवाजी चौक येथील अश्वारुढ शिवमूर्तीचे पूजन शुभम शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. गल्लीतून प्रचारफेरी जात असताना म. ए. समितीचा विजय असो, सिंह समिती शेळके यांचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. धर्मवीर संभाजी चौकमधील धर्मवीर संभाजी महाराज मूर्तीचे पूजन ऍड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. मरगाई गल्ली, लक्ष्मी गल्ली, नवी गल्ली, बसवाण गल्ली, गणपत गल्ली, तानाजी गल्ली येथे प्रचारफेरी काढण्यात आली. शिवमूर्ती आवारात घेण्यात आलेल्या सभेवेळी ऍड. सुधीर चव्हाण, सागर बिळगोजी आदींनी आपले विचार व्यक्त केले.

बस्तवाड गावामध्येही प्रचारफेरी काढण्यात आली. संभाजी गल्लीतून प्रचारफेरीला सुरुवात झाली. अश्वारुढ शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन उमेदवार शुभम शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर गणपत गल्ली, होळी गल्ली, नेताजी गल्ली, ताशिलदार गल्ली, शिवाजी गल्ली, तानाजी गल्लीमधून प्रचार करण्यात आला. शुभम शेळके यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. अनेक मतदारांनी शुभम शेळके यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी हलगा, बस्तवाड, कोंडुसकोप्प, तारिहाळ, मास्तमर्डी येथील म. ए. समितीचे अनेक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी अजून दोन दिवस लागणार

Patil_p

शेषगिरी कॉलेजमध्ये शिक्षक विकास कार्यशाळेचे उद्घाटन

Amit Kulkarni

बेळगावला रेमडेसिवीरचा पुरवठा सुरू

Amit Kulkarni

पुढील विधानसभा निवडणूकही येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली

Patil_p

मनपा अधिकाऱयांच्या हाती आता वॉकीटॉकी

Patil_p

रुक्मिणी नगरमधील रस्ता बनला धोकादायक

Amit Kulkarni
error: Content is protected !!