तरुण भारत

विनामास्क फिरणाऱयांना बसतोय चाप

बेळगाव प्रतिनिधी

    कोरोनाची दुसरी लाट येत  असल्याने  सर्वत्र कडक निर्बंध लादण्यात येत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱयांनी  कंबर कसल्याचे  दिसून येत आहे. शहराच्या विविध भागात विनामास्क फिरण्याऱयांवर कडक  कारवाई करून दंड वसूल करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.त्यामुळे विनामास्क फिरणाऱयांना चाप बसत असल्याचे दिसुनड येत आहे.

Advertisements

    कोरोनाचा प्रादूर्भाव वेगाने वाढत असल्याने  कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस दिवस वाढत आहे. मात्र नागरिकांना याचे गांभीर्य नसल्यामुळे ते विना मास्क फिरताना दिसत आहेत. यामुळे त्यांना शिस्त लावण्यासाठी  आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनी दंडात्मक कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सदर  कारवाई सुरू असून शनिवार दिनांक 10 एप्रिल रोजी देखील शहापुर नाथ पै सर्कल ,महात्मा फुले रोड, शहापूर खडेबाजार याठिकाणी विना मास्क फिरण्याकडून दंड वसूल करण्यात आला.

    यावेळी दिवसभरात  दोनशेहून अधिक जणांवर  मास्क  नसल्यामुळे कारवाई करण्यात आली.यावेळी महापालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी शिवानंद भोसले,  साजिद, कलावती अडबणी, सीता  कुंभार,  संजय पाटील,  नितीन देमट्टी  किरण देमट्टी, सुभाष गराणे, दयानंद कवलदार  यासह  अनेक कर्मचाऱयांनी कारवाई केली.

Related Stories

शांततेला सुरुंग लावण्यासाठी कनसेच्या गुंडांचा पुन्हा गोंधळ

Patil_p

सामाजिक अंतर व सुरक्षितता या विषयाचा अभ्यासक्रमांमध्ये समावेश करा

Patil_p

वीज कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Amit Kulkarni

कारवार केंद्राऐवजी दहावी विद्यार्थ्यांची सोय गोव्यातच करावी

Patil_p

मंगळवारपेठेत जनावरे दगावण्याचा प्रकार सुरूच

Amit Kulkarni

आत्मनिर्भर बनण्यासाठी फेरीवाल्यांना 10 हजार रुपये अर्थसाहाय्य

Patil_p
error: Content is protected !!