तरुण भारत

राज्यात शनिवारी ६,९५५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोनाचा वेग वाढतच आहे. राज्यात शनिवारी ६,९५५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. राज्यात गेल्या चोवीस तासांत ३६ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात वाढत्या सांख्येबरोबरच मृतांची संख्याही वाढत वाचली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात शनिवारी ६,९५५ बाधित रुग्णांची भर पडली. तर ३,३५० रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. शनिवारी राज्यात सकारात्मकता दर ७.०४ टक्के होता.

दरम्यान राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या वाढून ६१,६५३ झाली आहे. शनिवारपर्यंत राज्यात कोविडमुळे एकूण १२,८४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाची सर्वाधिक नवीन प्रकरणे आढळत आहेत. शनिवारी जिल्ह्यात नवीन प्रकरणांची संख्या ४,३८४ होती. तर २०२७ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परत आले. दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात शनिवारी १९ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ४,७८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

Related Stories

कर्नाटक जागतिक निविदाद्वारे दोन कोटी कोविड लसीचे डोस खरेदी करणार

Shankar_P

बेंगळूरमध्ये १९,६८० सक्रिय कंटेनमेंट झोन

Shankar_P

कर्नाटकाला 1,471 टन ऑक्सिजन पुरवठा करा

Amit Kulkarni

पोटनिवडणूक घोषणा झाल्यास अधिवेशन अर्ध्यावर गुंडाळणार?

Amit Kulkarni

शशिकला यांच्या सुटकेनंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष

Shankar_P

कर्नाटक: दिवाळीपूर्वी सरकारचे ग्रीन क्रॅकर्सबाबत स्पष्टीकरण जारी

Shankar_P
error: Content is protected !!