तरुण भारत

कोल्हापूर : सबजेलमधील ३१ बंदीजन कोरोना पॉझिटिव्ह; कारागृह प्रशासन हादरले, कारागृहातच उपचार सुरु

कारागृह प्रशासन हादरले, कारागृहातच उपचार सुरु, संपर्कातील बंदीजनांचे अलगीकरण

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

बिंदू चौक येथील सबजेलमधील ३१ जण बंदीजनांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे कारागृह प्रशासन हादरले असून या सर्व बंदीजनांवर कारागृहातील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. खबदारीच्या योजना म्हणून इतर बंदीजनांच्याही कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत.

बिंदू चौक येथील सबजेलमध्ये १९९ पुरुष तर १० महिला अंडर ट्रायल बंदीजन आहेत. सबजेलमधील एका कच्च्या कैद्यास इचलकरंजी येथे तपासणीसाठी नेण्यात आले होते. मंगळवारी हाच तो कच्चा कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. खबरदारीचा उपाय म्हणून त्या बंदीजनाच्या संपर्कात आलेल्या ८५ बंदीजनांची बिंदू चौक सबजेलच्या वतीने गुरुवारी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.

या चाचणीचे अहवाल शनिवारी रात्री कारागृह प्रशासनास प्राप्त झाले. ८५ पैकी ३१ बंदीजन पॉझिटिव्ह आढळले. यामुळे कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या ३२ कच्च्या कैद्यांवर कारागृहातच उपचार सुरु करण्यात आले आहेत. सीपीआर रुग्णालयाच्या मदतीने कारागृहात कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणीच या कैद्यांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान एकाच वेळी ३२ कैदी पॉझिटिव्ह आढळल्याने कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आहे. संपूर्ण कारागृहामध्ये औषध फवारणी करण्यात आले असून कारागृहात निर्जतुकीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

दरम्यान कारागृहात १ कारागृह अधिक्षक, व ३५ कर्मचारी आहेत. यापैकी ३० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरीत कर्मचाऱ्यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे.

इतर बंदीजनांचीही चाचणी घेणार

सबजेलमधील ३२ बंदीजन कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे इतर बंदीजनांचीही कोरोना चाचणी करुन घेण्यात येणार आहे. इतर सर्व बंदीजनांची नियमीत तपासणी सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती बिंदू चौक सबजेलचे अधिक्षक विवेक झेंडे यांनी दिली.

Related Stories

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४६ वर

triratna

कोल्हापूर : गडहिंग्लजमध्ये मराठा समाजाचे तासभर ‘रास्ता रोको’ आंदोलन

triratna

कोल्हापूर : केके गँगचा म्होरक्या कांबळेसह तिघांना पोलीस कोठडी

triratna

पंचगंगा साखर कारखानास्थळावरील ऊस तोडणी मजूरांच्या झोपड्यांना आग

triratna

कोल्हापूर : दुग्ध व्यवसायामुळेच शेतक-यांची आर्थिक प्रगती : चंद्रकांत निऊंगरे

triratna

पुलाची शिरोलीत चाळीस दिवसात ३२ मृत्यू

triratna
error: Content is protected !!