तरुण भारत

सांगली : मिरजेत मेडिकल गोडाऊनला भीषण आग

एक कोटींचे औषधी साहित्य जळून खाक झाल्याचा अंदाज, शॉर्ट सर्किटने लागली होती आग

प्रतिनिधी / मिरज

Advertisements

शहरातील स्टेशन रोड जवळील प्रताप कॉलनी येथे पॉप्यूलर मेडिकल एजन्सी या गोडावूनला शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली. या आगीत संगणक, इन्व्हरटर, लाकडी टेबल, पंख्यांसह सुमारे एक कोटी रुपयांच्या औषधांचा साठा जळून खाक झाल्याचा अंदाज मेडीकल एजन्सीच्या मालक प्रियांका राहूल धनवडे (वय 30, रा. प्रताप कॉलनी, मिरज) यांनी व्यक्त केला आहे. महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु होते.

घटनास्थळावरुन तसेच अग्निशमन विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, लक्ष्मी मार्केट येथे प्रियांका धनवडे यांच्या मालकीचे पॉप्यूटलर मेडिकल स्टोअर असून, औषधसाठा ठेवण्यासाठी स्टेशन रोडवरील प्रताप कॉलनीत त्यांच्या घराजवळच गोडावून आहे. या गोडाऊनमध्ये कोट्यवधी रुपयांचा औषधीसाठा ठेवण्यात आला होता. शनिवारी रात्री दहा वाजून 35 मिनीटांनी गोडाऊनमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे इन्व्हरटरने पेट घेतला. बघता बघता लाकडी टेबल, कॉन्टर, कॉम्फ्यूटरने पेट घेतला. छतावरच्या पंख्यालाही आग लागली. आगीच्या ठिणगा औषधांच्या बॉक्सवर पडल्याने औषधी साठ्यानेही पेट घेतला.

गोडाऊनधील खिडक्यांमधून आग आणि धुराचे लोट बाहेर येत होते. अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर अग्निशमनचे अधिकारी चिंतामणी कांबळे, सचिन जगताप, जावेद मुश्रीफ, फायरमन सागर गायवाकड, विशाल रसाळ आदी कर्मचारी अग्निशमनचा एक बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान या आगीत सुमारे एक कोटी रुपयांचा औषधी साठा जळून खाक झाल्याचा अंदाज प्रियांका धनवडे यांनी व्यक्त केला आहे. रविवारी सकाळी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद देण्यासह घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

Related Stories

सांगली : त्या बकर्‍याचे वय अवघे दीड महिने अन् किंमत ७० हजार

triratna

जिल्ह्याच्या ४४३ कोटींच्या प्रारुप आराखड्याला मंजुरी

triratna

सांगली जिल्ह्यात सहा जणांचा बळी, विक्रमी 354 रूग्ण वाढले

Shankar_P

मिरजेत रस्त्यांवरील बेवारस वाहनांचा कचरा साफ

triratna

सांगली : इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेच्यावतीने सायकल मोर्चा

triratna

इस्लामपुरात मराठा समाज आक्रमक तरूणांनी केले मुंडण

triratna
error: Content is protected !!