तरुण भारत

सांगली : पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक

प्रतिनिधी / मिरज

मिरज तालुक्यातील सावळी येथे एसटी स्थानकाजवळ कमरेला विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या विनोद चंदू कांबळे (वय 28, रा. मेढगिरी, ता. जत) या तरुणास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.

Advertisements

स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहिती नुसार विनोद कांबळे हा तरुण कमरेला पिस्तूल लावून सावळी एसटी स्टँडजवळ थांबला असल्याचे समजले. पोलिसांनी तेथे सापळा रचला असता कांबळे हा पिस्तूलसह मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे पिस्तूल व त्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना त्याला अटक करुन पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Related Stories

लकी ड्रॉमध्ये गाडी मिळाल्याचे सांगत पावणे तीन लाखांचा गंडा

triratna

दुष्काळी खानापूर तालुक्यात पावसाची दिवसात शंभरी

triratna

मिरजेतील स्मशानभूमी पुन्हा बंदीस्त

triratna

अर्थसंकल्पात दुर्लक्ष केल्यामुळे वस्त्रोद्योग साखळीतून नाराजी

triratna

मिरज-बेडग रोडवरील कचरा डेपोस आग, परीसरात धुराचे लोट

triratna

सांगली बाजार समितीवर तत्काळ प्रशासक नियुक्ती करा

triratna
error: Content is protected !!