तरुण भारत

दिल्ली : 25 वेळा चाकूने भोसकून घेतला पत्नीचा जीव

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : 

अनैतिक संबंधांच्या संशयातून दिल्लीत एका युवकाने भररस्त्यात आपल्या पत्नीला चाकूने 25 वेळा भोसकून तिची निर्घृण हत्या केली. या हृदयद्रावक घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

Advertisements

नीलू हरिश मेहता (वय 26) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती हरिश मेहताला अटक केली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठ महिन्यांपूर्वीच हरिश मेहतासोबत तिचे लग्न झाले होते. हरिश या मूळचा गुजरातमधील अलकापूरी येथील रहिवाशी असून, दिल्लीत तो एका मॅरेज ब्युरोमध्ये काम करत होता. तर त्याची पत्नी सफदरगंज येथील रुग्णालयात काम करत होती. हरिशला आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यावरुन दोघांमध्ये अनेकदा वादही झाले होते. त्यानंतर नीलू आपल्या आईवडिलांकडे राहण्यास गेली होती. त्याचाच राग मनात धरुन हरिशने तिला भररस्त्यात गाठले. तिथेच तिच्यावर चाकूने सपासप वार करुन तिची हत्या केली.

Related Stories

27 जुलैपासून नियमित सुनावणी

Patil_p

शेतकऱयांची दिशाभूल करू नका !

Patil_p

डीआरडीओकडून बायो सूटची निर्मिती

Patil_p

शंभरहून अधिक लोन ऍप्सना दणका

Patil_p

हरिद्वार : कुंभमेळ्यात लाखो भक्तांची गर्दी; कोरोनाच्या नियमांचे तीनतेरा

pradnya p

उत्तर प्रदेशात एका दिवसात 1155 नवे कोरोना रुग्ण; मृतांची एकूण संख्या 785 वर

pradnya p
error: Content is protected !!