तरुण भारत

संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा तपास करून कारवाई करणार- जयंत पाटील

प्रतिनिधी / सांगली

संभाजी भिडे हे वादग्रस्त वक्तव्य करुन कोरोना सारख्या आपत्तीच्या काळात राज्यसरकार आणि समाज यांच्यात बाधा करतात. त्यांच्या वक्तव्याचा तपास करुन योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते रविवारी सांगलीत आले होते. जिल्‍हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली यावेळी बोलताना त्यांनी पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरताना आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगून ते म्हणाले, सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर काटेकोरपणे करण्यात यावा. तसेच जिथे जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आहेत त्या प्रमाणात राज्यांना केंद्र सरकारकडून लसी मिळाव्यात.

Advertisements

Related Stories

राज्यात कोरोना मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण सांगली जिल्ह्यात

Shankar_P

महाराष्ट्र सरकारकडून रेड झोनमध्येही मद्यविक्रीला सशर्त परवानगी

pradnya p

30 किलो हेरॉईनसह 8 पाकिस्तानी नागरिकांची बोट पकडली

pradnya p

दिल्ली विद्यापीठ : अंतिम वर्षाच्या परीक्षा तुर्तास स्थगित

pradnya p

एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Shankar_P

तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1,34,226 वर

pradnya p
error: Content is protected !!