तरुण भारत

सांगली : लॉकडाऊन करण्यापूर्वी गरिबांच्या पोटापाण्याची सोय करा : आमदार पडळकर, सदाभाऊ खोत

प्रतिनिधी / सांगली

लॉकडाऊनला भाजपचा विरोध नाही परंतु लॉकडाऊन करण्यापूर्वी गरिबांच्या पोटापाण्याची सोय सरकारने करावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली. खासगी दवाखान्यांमध्ये ‘रेमडेसिवीर इंजेक्शन’ मोफत मिळावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Advertisements

कोरोनाच्या बाबतीत राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन अजिबात गंभीर नाही असा आरोप करून आमदार पडळकर म्हणाले, जिल्ह्यात किती पॉझिटिव्ह रुग्ण आहेत किती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात उपचारासाठी किती बेड आहेत, कोणत्या दवाखान्यात किती बेड शिल्लक आहेत. याबाबत प्रशासनाने केवळ कागदोपत्री तयारी केली असल्याचे दिसते. परंतु प्रत्यक्षात उपचारासाठी रुग्णांचे प्रचंड हाल सुरू आहेत.

खाजगी दवाखाने अव्वाच्या सव्वा बिल आकारून रुग्णांची लूट करत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची अध्यावत माहिती ठेवण्यासाठी सेंटर कमांड सिस्टीम कार्यान्वित करावी अशी गेल्या वर्षभरापासून आपली मागणी आहे परंतु त्यादृष्टीने प्रशासनाची कोणतीही तयारी दिसत नाही. त्याचबरोबर कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी लॉकडाऊन करण्यास भाजपचा विरोध नाही. परंतु केंद्र शासनाने ज्याप्रमाणे या काळात गरिबांना गहू तांदूळ डाळी रेशनवर दिल्या होत्या त्याप्रमाणे राज्य शासनाने ही सोय करावी. गोरगरिबांचे रोजगार बुडाल्याने त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने संवेदनशीलपणे निर्णय घ्यावा अशी मागणीही आमदार पडळकर आणि आमदार खोत यांनी केले.

Related Stories

भुयारी गटार योजनेवरुन विकास आघाडी, राष्ट्रवादीत जुंपली

Sumit Tambekar

सांगलीचा मृत्युदर राज्यांपेक्षा जास्त – देवेंद्र फडणवीस

Abhijeet Shinde

बिहार : हाजीपुरमध्ये दिवसा उजेडात एचडीएफसी बँकेत 1 कोटी 19 लाखांची लूट

Rohan_P

ब्लॅक फंगसवरील इंजेक्शनच्या उत्पादन-आयातीला परवानगी

Patil_p

डोक्यात फरशी घालून मुलाचा खुन

Abhijeet Shinde

सांगली : शिवानंद स्वामींच्या उपोषणास पाठिंबा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!