तरुण भारत

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत गुरूवारपासून ऑनलाईन परीक्षा

1 लाख विद्यार्थी ऑनलाईन तर 20 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार परीक्षा वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत 15 एप्रिलपासून होणाऱ्या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. 1 लाख 20 हजार विद्यार्थ्यांपैकी 1 लाख विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. तर 20 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत. ऑफलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर घेण्यात येणार आहे. तसेच 6 ते 12 एप्रिल दरम्यान पुढे ढकललेल्या पेपरचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी परिपत्रकाव्दारे केले आहे.

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत ऑक्टोबर – नोव्हेंबर सत्रातील विद्यापीठ, महाविद्यालयीन परीक्षांना 22 मार्चपासून सुरूवात झाली आहे. परंतू कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 6 ते 12 एप्रिल दरम्यानचे पेपर पुढे ढकलण्यात आले होते. तसेच जे विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार होते त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडण्यासाठी 11 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. यामध्ये 1 लाख ऑनलाईन तर 20 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत. ऑनलाईन परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांची परीक्षा 15 एप्रिलपासून ऑनलाईन पध्दतीने सुरू होणार आहे. तर 6 ते 12 एप्रिल दरम्नाच्या परीक्षाही यापरीक्षा पूर्ण झाल्यानंतर घेण्यात येतील. ऑफलाईन परीक्षा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सवडीने घेण्यात येणार येतील. या परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे, तरी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक पळसे यांनी केले आहे.

Related Stories

सातारा : डॉ. शशिकांत डोईफोडेंनी आरोपीचा पुरवला पिच्छा

datta jadhav

सातारा : गोळीबार मैदानच्या मुख्य रस्त्यावरून वाहतेय सांडपाणी

datta jadhav

रामराजे अन् उदयनराजे यांची पुण्यात खाजगी कार्यक्रमात भेट

Patil_p

कोल्हापूर : व्हेंटिलेटरनी घेतला `मोकळा श्वास’

Abhijeet Shinde

गोकुळकडून सिध्‍दगिरी हॉस्‍पीटलला व्‍हेंटिलेटर प्रदान

Abhijeet Shinde

कोल्हापूरसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना : राज्यमंत्री यड्रावकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!