तरुण भारत

‘अलिबाबा’ला दणका; ठोठावला तब्बल 18.2 अब्ज युआनचा दंड

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

ई-कॉमर्स क्षेत्रातील जॅक मा यांच्या ‘अलिबाबा’ या उद्योगसमूहाला चीनमधील नियामक यंत्रणेने मोठा दणका देत तब्बल 18.2 अब्ज युआन म्हणजेच (2.8 अब्ज डॉलरचा) दंड ठोठावला आहे. 

Advertisements

अलिबाबाने आपल्या व्यापारपेठेवरील प्रभावाचा गैरफायदा घेत व्यापाऱ्यांना त्यांच्या बाजूने करून घेतले. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांच्या हक्कांचा भंग झाल्याचा ठपका नियामक यंत्रणेने ठेवला होता. मागील वर्षी ख्रिसमसच्या काळामध्ये यासंदर्भात चौकशीला सुरुवात झाली होती. ती चौकशी शनिवारी पूर्ण झाली. 

अलिबाबाला ठोठावण्यात आलेला दंड खूपच मोठा आहे. तरी देखील अलिबाबाने या दंडाचा स्वीकार केला असून, तो भरण्याची तयारी दर्शविली आहे.

Related Stories

केनेडींचा मारेकरी होता केजीबीच्या संपर्कात?

Amit Kulkarni

न्यूझीलंडच्या ‘ब्लॉगर’वर भारतात प्रवेशबंदी

Patil_p

मालदीवचे माजी अध्यक्ष कोरोनाबाधित

Patil_p

नायजेरियात दोन भारतीयांचे अपहरण, मुक्ततेचे प्रयत्न

Patil_p

महात्मा गांधींच्या खापरपणतीला 7 वर्ष तुरुंगवास

datta jadhav

अमेरिका : तीव्र संकट

Patil_p
error: Content is protected !!