तरुण भारत

नियमांचे पालन करीत महात्मा फुले जयंती साजरी

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते बिंदू चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर पोलिस अधिक्षक तिरूपती काकडे यांच्या हस्ते बिंदू चौकातील फुले यांच्या पुतळÎास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माजी महापौर निलोफर आजरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत गर्दी न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी देसाई यांनी जनतेला केले.

महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्त साधून शहरातील विविध संघटना, पक्षांनी बिंदू चौकातील महात्फा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती कृती समिती, लोकजनशक्ती पार्टी, बहुजन परिवर्तन पार्टी यासह अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक जबाबदारी ओळखत ठराविक लोकांच्या उपस्थितीत महात्फा फुले जयंती साजरी केली. मिरवणूका, व्याख्याने आदी कार्यक्रम रद्द करून शासनाच्या नियमांचे पालन करीत प्रतिमा, पुतळÎास अभिवादन केले. बिंदू चौकात उपस्थित कार्यकर्त्यांनी `महात्मा फुले की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ अशा घोषणा दिल्या.

बिंदू चौकात मोजकेच कार्यकर्ते असल्याने जिल्हाधिकाऱयांनी समाधानही व्यक्त केले. तसेच गेल्या दोन दिवसापासून विक एंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही सांगितले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी, असा संदेशही त्यांनी दिला. आतषबाजी, मिरवणून काढू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी देसाई यांनी केले.

यावेळी शहर पोलिस उपाधिक्षक मंगेश चव्हाण, लोकजनशक्तीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले, सुशिलकुमार कोल्हटकर, दिगंबर लोहार, तकदीर कांबळे, चंद्रकांत कोवळे, आर. के. कांबळे, बहुजन पररिवर्तन पार्टीचे अध्यक्ष बाजीराव नाईक, जिल्हाध्यक्षा शोभा नलवडे, मार्गदर्शक उत्तम नलवडे, सामाजिक कार्यकर्ते जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समिती

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त बिंदू चौकातील त्यांच्या पुतळÎास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. गायकवाड म्हणाले, महात्मा फुले यांनी सामाज सुधारकांचा पाया घातला. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात अमूलाग्र क्रांती घडवली. गुलामगिरी, शेतकऱयांचा आसूड यासारखे ग्रंथ लिहून साहित्यक्षेत्रातही युगप्रवर्तक कार्य कले. प्रा. शहाजी कांबळे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी रूपाली वायदंडे, टी. एस. कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, डी. जी. भास्कर, अनिल धनवडे, प्रविण आजरेकर, निलेश बनसोडे, पांडूरंग कुरूकलीकर, आदी उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांच्यासह इंग्रजी अधिविभागाच्या प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. ए. एम. सरवदे, दीपक भादले, आदी उपस्थित होते.

कोल्हापूर महानगरपालिका

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त चेतन कोडे, संदीप घार्गे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Related Stories

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मायक्रो फायनान्सच्या तक्रारींसाठी ‘या’ क्रमांकावर संपर्क करा – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

ग्रंथालयांना दिलासा : थकीत अनुदानाची रक्कम अदा करणार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात 73 नवे रूग्ण, 14 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

राजू शेट्टी काढणार पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!