तरुण भारत

‘टकाटक’च्या यशानंतर… आता येणार टकाटक 2

बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेला आणि परीक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केलेला ‘टकाटक’ हा मराठी चित्रपट आता सिक्वेलच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘टकाटक’ने विक्रमी व्यवसाय करत 2019 च्या पूर्वार्धाच्या अखेरीस मराठी सिनेसृष्टीत नवचैतन्य निर्माण केलं होतं. लॉकडॉऊनच्या पार्श्वभूमीवर ‘टकाटक 2’ची घोषणा केल्याने सिनेसृष्टीत पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम तसेच सहनिर्माते जगत सिंग यांनी ‘टकाटक 2’ची अधिकृत घोषणा केली आहे. याप्रसंगी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘टकाटक 2’चं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं. ‘टकाटक’ची कथा तरुणाईवर आधारित होती. यासोबतच या चित्रपटात एक मेसेजही दडला होता, त्यामुळे ‘टकाटक 2’ या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनीच ‘टकाटक 2’ची कथा आणि पटकथा लिहिली असून संवाद किरण बेरड यांचे आहेत. गीतकार जय अत्रे यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना संगीतकार वरूण लिखते संगीतबद्ध करणार असून हजरत शेख वली कॅमेरामन आहेत. कलाकारांची नावे सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत. ‘टकाटक’ या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्याने ‘टकाटक 2’च्या रूपात पुढील भाग आणण्याची कल्पना सुचल्याचं दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी सांगितले. ‘टकाटक 2’मध्ये प्रेक्षकांना सुमधूर गीत-संगीताने सजलेली एक प्रेश प्रेमकथा पाहायला मिळणार आहे.

Related Stories

हिरो नंबर 1 गोविंदा ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर

pradnya p

विदेशी भक्तांना पोस्टाद्वारे मिळते भस्म

Amit Kulkarni

‘टकाटक’च्या यशानंतर आता येणार ‘टकाटक 2’

pradnya p

अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला एनसीबीकडून समन्स

pradnya p

मुलगी झाली हो मालिकेत भावनिक वळण

Patil_p

टेलिव्हिजनवरील आईची इमेज बदलली पाहिजे : प्रिया मराठे

Patil_p
error: Content is protected !!