तरुण भारत

दोन दिवसात लस उपलब्ध होणार

सावंतवाडी:

गेल्या चार दिवसांपासून कोरोना लस उपलब्ध न झाल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्र बंद आहे. पुढील दोन दिवसात लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी केले.

Advertisements

जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून कोरोना लस सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी उपलब्ध होते. आतापर्यंत आलेल्या लसीचा पुरवठा नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात आला. जसजसा प्रशासनाकडून साठा उपलब्ध झाला तसे लसीकरण करण्यात आले. लस गेल्या चार दिवसांपासून उपलब्ध न झाल्याने अनेक लाभार्थ्यांना माघारी परतावे लागले. गर्दी होत असल्याने नागरिकांच्या माहितीसाठी लसीकरण केंद्रावर लस नसल्याचा फलक लावावा लागला आहे. जिल्हय़ातच लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात शनिवारपासून मोठय़ा प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. त्यामळे आता जिल्हय़ासाठी लस मिळण्याची आशा आहे. जिल्हा रुग्णालयात लस उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात ही लस मिळेल अशी अपेक्षा आहे. लस आल्यानंतर लसीकरण केंद्र सुरू करण्यात येईल, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

Related Stories

वेंगुर्लेचा तरूण लोटेतून बेपत्ता

Patil_p

रत्नागिरी (दापोली) : ‘ला निनो’च्या प्रभावाने आंबा ‘प्रभावित’ होण्याची शक्यता

triratna

कराडजवळ कारच्या भीषण अपघातात 4 ठार

NIKHIL_N

कुत्र्यांद्वारे स्पॅनिश तरुण देतोय ‘वेद’ना-मुक्ती’चा संदेश

NIKHIL_N

चाकरमान्यांसाठी पालपेणेत तब्बल 90 घरे केली खाली

Patil_p

ई-संजीवनी ओपीडीतून घरबसल्या आरोग्य सल्ला!

Patil_p
error: Content is protected !!